💥खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने भिसे कुटुंबाला मिळाली ४ लाखाची आर्थिक मदत...!


💥वीज अंगावर पडल्याने भिसे कुटुंबातील इंदिराबाई भिसे यांचा ७ जून २०२१ रोजी जागीच मृत्यू झाला होता💥

✍️शिवशंकर निरगुडे - हिंगोली

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील जरोडा येथील इंदिराबाई भिसे यांचा वीज पडून मृत्यू झाल्यानंतर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे ४ लक्ष रुपयाची आर्थिक मदत भिसे कुटुंबाला देण्यात आली . 

                     जरोडा येथील इंदिराबाई कोंडबाराव भिसे या आपल्या शेतात मशागतीचे काम करत असताना अचानक  विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे वीज अंगावर पडून इंदिराबाई भिसे यांचा ७ जून २०२१ रोजी जागीच मृत्यू झाला . आपल्या परिवाराला शेतकाम आणि मोलमजुरी करून जागविणाऱ्या इंदिराबाई यांचा मृत्यू झाल्यामुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला . खासदार हेमंत पाटील यांना याबाबत समजल्यानंतर त्यांनी तातडीने भिसे कुटुंबाचे सांत्वन करून त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांच्या कळमनुरी येथील जनसंपर्क कार्यालयांमार्फत कागदपत्रांची पूर्तता करून दाखल केले  व सातत्याने पाठपुरावा केल्यांनतर अवघ्या  महिन्याभरात भिसे कुटुंबाला आर्थिक मदत  मंजूर करण्यात आली व स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्यांना ४ लक्ष रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. याकामी कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसिलदार मयूर खेंगळे, लिपिक राजू लांडगे यांच्यासह खासदार हेमंत पाटील यांचे कळमनुरी -औंढा विधानसभा क्षेत्राचे जनसंपर्क अधिकारी अमोल बुद्रुक, यांनी सहकार्य केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या