💥परभणी जिल्ह्यात आज दि.९ ऑगस्ट रोजी एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नाही...!

 


💥जिल्ह्यात आज सोमवारी कोरोनाबाधीत रुग्ण संख्याही झिरो आणि मृत्यू संख्याही झिरो💥

परभणी (दि.९ ऑगस्ट २०२१) - परभणी जिल्ह्यात आज सोमवार दि.९ ऑगस्ट २०२१ रोजी एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नसून जिल्ह्यात आज सोमवारी एकाही कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला नसल्यामुळे जिल्ह्यातून कोरोना आता हद्दपार होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

दरम्यान जिल्ह्यात आज सोमवार दि.९ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात १३ कोरोनाबाधीत रुग्ण उपचार घेत असून रुग्णालयात उपचार घेऊन पुर्णपणे बरे झालेल्या २ कोरोनामुक्त रुग्गाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे तर जिल्ह्यात आजपर्यंत ५११९० कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून यशस्वी उपचारा नंतर आजपर्यंत ४९८९० कोरोनाबाधीत कोरोनामुक्त झाले आहेत तर जिल्ह्यात आजपर्यंत १२८७ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने एका प्रेसनोट द्वारे कळवले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या