💥पुर्णा शहरातील कोळीवाडा परिसरात जागतिक आदिवासी दिन उत्साहाने साजरा...!


💥यावेळी आदिवासी कोळी समाजाचे धाडसी नेतृत्व किशोर सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती💥

 पूर्णा ;  येथील कोळीवाडा परिसरात आज सोमवार दि.०९ ऑगस्ट २०२१ रोजी जागतिक आदिवासी दिना निमित्त आदिवासी कोळी महादेव समाजाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन कोरोनाचे नियमांचे पालन करित उत्साहाने साजरा करण्यात आला.

यावेळी कोरोना महामारी लक्षात घेता आदिवासी कोळी समाजातील मोजक्या समाजबांधवांची उपस्थिती होती यावेळी आदिवासी कोळी समाजाचे धाडसी नेतृत्व किशोर सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या आयोजित कार्यक्रमात समाजातील मान्यवर गणेश सुर्यवंशी,कोंडीबा भंगे ,राजु सोळंके, दिनाजी जगताप, मोहन सोळंके,  नवनाथ जंगले ,बालाजी सोळंके ,तुकाराम सोळंके,लहू मेघमाळे,गोपी रोनटे,खंडू भंगे, दिलीप भंगे,नागेश,सोळंके व सर्व समाज बांधव उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या