💥परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी....!


💥विमा कंपन्यांना ऑफलाईन तक्रारी स्वीकारून नुकसान भरपाई देण्यासाठी आदेशित करण्याचीही केली मागणी💥

परभणी तालुक्यातील झाडगाव येथे अतिवृष्टीमध्ये जवळपास सर्वच शेती उध्दवस्त झाली आहे. पंचनामे करीत असताना महसुल विभागाच्या कर्मचान्यांनी भेदभाव केल्याची भावना गावकऱ्यांमध्ये मोठया प्रमाणावर आहे. त्या शिवाय ७२ तासाच्या आत नुकसान भरपाईची तक्रार करणे विम्या कंपन्यांनी सक्तीचे केलेले आहे. मोठया प्रमाणावर झालेला पाऊस त्यामुळे तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली होते. अशा परिस्थितीत महसुल विभागाचे कर्मचारी वेळेत पंचनामा करण्यासाठी पोहचू शकले नाही, पंचनामा वेळेत न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना ७२ साताच्या आत तक्रार करणे शक्य झाले नाही. करीता आपणास विनंती आहे की , झाडगाव ता. जि. परभणी येथील अतिवृष्टी नुकसान झालेल्या शतकन्यांचे सरसकट पंचनामे तात्काळ करावे व याबाबत महसुल विभागाला सूचना द्याव्यात तसेच पंचनामे वेळेवर न भेटल्याने उशिर झालेल्या तक्रारकर्त्या शेतकऱ्यांची ऑफलाईन तक्रार विम्या कंपन्यांनी स्विकारावी याबाबतही विमा कंपनी प्रतिनिधींना सूचना देण्यात याव्यात व पिकविम्याची रक्कम तसेच शासकीय मदत तात्काळ मदत करावी या मागणी साठी काल दि.०३ ऑगस्ट २०२१ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, युवा आघाडी उपशहर प्रमुख पिंटू कदम, मीडिया प्रभारी नकुल होगे, झाडगाव शाखा प्रमुख ओंकार खटिंग, ओंकार खटिंग, मंजाजी खटिंग,गोपाळ शिंदे, मोकिंद खटिंग,अंगद खटिंग, कैलाश बोबडे, कैलाश सुरवसे व गावातील १०५ शेतकरी व ग्रामस्थांच्या सह्या आहेत........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या