💥राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळायचे असल्यास पहिलीपासून सर्वच शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करा...!


💥शाळा सुरू करण्यासाठी हीच वेळ योग्य राज्य सरकारच्या निर्णयाबाबत तज्ज्ञांमध्ये नाराजी💥 

💥विद्यार्थ्यांवरील मानसिक परिणामांबाबत चिंता💥

मुंबई :  राज्यातील शाळा सरसकट सुरू होण्याच्या वाटेवर असताना राज्य सरकारने त्या पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली असून उलट शाळा सुरू करण्यासाठी हीच वेळ योग्य असल्याचे मत राष्ट्रीय पातळीवर व्यक्त होत आहे. 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळायचे असल्यास पहिलीपासून सर्वच शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात याव्यात अशी मागणी शिक्षणतज्ज्ञांकडून केली जात आहे राज्यात आठवीपासूनचे वर्ग २७ जुलैपासून सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची उपस्थिती हळूहळू वाढू लगल्याचे दिसत होते राज्यातील १० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी नियमित शाळेत जात आहेत येत्या मंगळवार दि.१७ ऑगस्ट २०२१ पासून पाचवी ते आठवीचेही वर्ग सुरू करण्याची घोषणा शासनाने केली होती मात्र एका दिवसात ती मागे घेण्यात आली. 

शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेतल्यामुळे शिक्षक, तज्ज्ञ अशा सर्वच स्तरांतून तातडीने शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे याबाबत शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या ऑनलाइन बैठकीत संबंधितांनी एकमुखाने शाळा सुरू करण्याची मागणी केली ‘शाळा बंद करण्याच्या करोनाविषयक कृती गटातील सदस्यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे तो केवळ आरोग्याच्या दृष्टिकोनातून घेतलेला एकांगी निर्णय आहे. तो घेताना समाजाच्या इतर घटकांचा साकल्याने विचार करण्यात आलेला नाही जागतिक आरोग्य संघटनेनेही शाळा सुरू करण्याची सूचना केली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या