💥वाशिम येथे शिवसेनेच्या वतीने राणेंच्या विरोधात कोंबडी फेक आंदोलन...!


💥त्या आधी नारायण राणे यांच्या विरोधात वाशिम शहरपोलिसात तक्रार दाखल करण्यात आली💥

वाशिम -वाशिम येथे भाजपाचे नारायण राणे यांच्या वक्तव्यावरुन वातावरण तापले असल्याने शिवसेनेने कोंबडी फेक असे अनोखे आंदोलन केले आहे.

            भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या स्थरांचे अपशब्द वापरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान केला. त्याचे पडसाद वाशिम मध्ये उमटले आहेत. आधी नारायण राणे यांच्या विरोधात वाशिम शहर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर स्थानिक पाटणी चौकात शिवसेनेच्या वतीने राणे यांच्या विरोधात कोंबडी फेक आंदोलन केले. यावेळी कोंबडी चोराला अटक करा तसेच राणे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतितात्मक पुतळ्याचे दहन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करीत आंदोलकांना स्थानबद्ध केले....


प्रतिनिधी-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या