💥देशात लशींचे दुष्परिणाम नगण्य,'लोकल सर्कल्स’ संस्थेच्या पाहणीतील निष्कर्ष....!


💥सीरम इन्स्टिटय़ूटऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड या लशींचा वापर प्रामुख्याने करण्यात आला💥

नवी दिल्ली : भारतातील करोनाप्रतिबंधक लसीकरणात आतापर्यंत कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या लशींचा जास्त वापर करण्यात आला असून त्यांचे सहपरिणाम सौम्य तरी होते किंवा अनेकांमध्ये असे परिणाम दिसून आले नाहीत कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन यांच्या दोन मात्रा घेतलेल्यांमध्येही असे परिणाम आढळून आले नाहीत देशात १६  जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले असून त्यात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन व सीरम इन्स्टिटय़ूटऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड या लशींचा वापर प्रामुख्याने करण्यात आला. 

लसीकरणाच्या सह दुष्परिणामांबाबत ‘लोकल सर्कल्स’ या संस्थेने केलेल्या पाहणीत असे आढळून आले की कोव्हिशिल्डची पहिली मात्रा घेतलेल्या ७० टक्के व कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेतलेल्या ६४ टक्के लोकांमध्ये एकतर किरकोळ परिणाम दिसून आले किंवा दुष्परिणाम झालेच नाहीत कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा घेतलेल्या ७५ टक्के लोकांमध्ये तर कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा घेतलेल्या ७८ टक्के लोकांमध्ये दुष्परिणाम जाणवले नाहीत किंवा ते किरकोळ स्वरूपाचे होते कोव्हिशिल्डची पहिली मात्रा घेतलेल्यांपैकी ३० टक्के व्यक्तीत काही दुष्परिणाम आढळून आले. 

त्यात २९ टक्के जणांना ताप आला तर १ टक्के लोकांना  कोविडचा संसर्ग झाला कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेतलेल्या ३० टक्के लोकांमध्ये दुष्परिणाम काही प्रमाणात जाणवले त्यात १ टक्के लोकांत तापापेक्षा गंभीर परिणाम होते पण कुणाला संसर्ग झाला नाही कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा घेतलेल्यात २० टक्के जणांना ताप आला तर ४ टक्के लोकांना कोविड संसर्ग झाला तसेच १ टक्के लोकांमध्ये तापापेक्षा गंभीर परिणाम दिसले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या