💥चांभई येथे डेंग्युसदृश्य आजाराचे थैमान : धुरफवारणीसह प्रतिबंधात्मक उपाय करण्याची मागणी...!

💥लेखी निवेदनाव्दारे मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रितम गोविंदराव भगत यांनी गटविकास अधिकारी यांना केली💥

✍🏻फुलचंद भगत

मंगरूळपीर:-तालुक्यातील चांभई येथे डेंगुसदृश्य आजाराने थैमान घातले असुन गावातील स्वच्छता करुन धुरफवारणी करावी अशी दि.२३ आॅगष्ट रोजी लेखी निवेदनाव्दारे मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रितम गोविंदराव भगत यांनी गटविकास अधिकारी यांना केली आहे.

         गटग्रामपंचायत असलेल्या चांभई-बालदेव येथे गेल्या महिनाभरापासुन डेंगुसदृश्य आजाराने थैमान घातले असुन सोबतच मलेरिया टायफाइड आणी व्हायरल फिवरनेही ग्रामवाशी ञस्त आहेत.याकडे माञ ग्रामपंचायतचे साफ दुर्लक्ष आहे.या आजाराविषयी गावकर्‍यांनी अनेकवेळा सरपंच आणी सचिव यांना अवगत केले होते परंतु या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने कानाडोळा केलेला दिसतोय.गावात त्वरीत धुरफवारणी करुन पसरलेल्या आजारावर पायबंद घालावा आणी ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रितम भगत यांनी लेखी निवेदनाव्दारे केली आहे....


प्रतिनीधी-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या