💥राज्यातील पर्यटन महामंडळाचे खासगीकरण होणार ? ; मोक्याच्या जागा विकासकांना देण्याचा झाला निर्णय...!


💥पहिल्या टप्प्यात माथेरान,महाबळेश्वर, रायगड, सिंधुदुर्ग,ताडोबा,औरंगाबाद येथील मोकळ्या जागा विकासकांना देणार💥 

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन  एम.टी.डी.सी.) मालकी असलेल्या पर्यटन स्थळांजवळच्या मोकळ्या जागा आणि विकसित केलेल्या मालमत्ता लवकरच खासगी विकासकांकडे जाणार आहेत. 

करोनामुळे पर्यटन महामंडळ तोट्यात असून निधीची चणचण असल्याने सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर (पी.पी.पी.) मोक्याच्या जागा विकासकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे महामंडळाची खासगीकरणाकडे वाटचाल सुरू झाल्याचे दिसत आहे पर्यटन महामंडळाची पुणे विभागातील निवासस्थाने सुरू शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात माथेरान, महाबळेश्वर, रायगड, सिंधुदुर्ग, ताडोबा आणि औरंगाबाद येथील मोकळ्या जागा विकासकांना देण्यात येणार असून त्यासाठीच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत जागांच्या बदल्यात पर्यटकांना पंचतारांकित सुविधा उपलब्ध होतील असा दावा महामंडळाने केला आहे. 

करोनामुळे पर्यटन उद्योगाची वाताहत पर्यटन महामंडळाचे पर्यटक निवास आणि मोकळ्या जागा मोक्याच्या जागी आहेत महामंडळाच्या अनेक मालमत्ता निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय पर्यटन स्थळांच्या ठिकाणी आहेत काही पर्यटनस्थळी केवळ महामंडळाची निवासस्थाने असून या ठिकाणी खासगी विकासकांना बांधकामे करण्यास परवानगी नाही या निर्णयामुळे महामंडळाच्या मोक्याच्या जागा आता खासगी विकासकांकडे जाणार आहेत राज्यातील निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले थंड हवेची ठिकाणे आणि निसर्गसंपन्न डोंगररांगा येथील जागा खासगी विकासकांना देण्याचे निश्चित करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या