💥परभणी जिल्ह्यातील सोनपेठचे तहसीलदार आशिषकुमार बिरादार ५५ हजारांच्या लाच प्रकरणात एसीबीच्या ताब्यात...!


💥एका वाळूचे टिप्पर सोडविण्याकरीता ही लाच मागितल्याची माहिती आहे💥

परभणी (दि.२ आॕगस्ट २०२१) - जिल्ह्यात एकामागून एक भ्रष्टाचारी अधिकारी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकत असून जिल्ह्यातील सेलू येथील लाचखोर उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल लाचप्रकरण ताजेच असतांना आज पुन्हा सोनपेठ येथील तहसीलदार आशिषकुमार बिरादार यांना एका तक्रारकर्त्याकडून ५५ हजार रुपयांची लाच मागितल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने आज सोमवार दि.०२ आॕगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ताब्यात घेतले असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. एका वाळूचे टिप्पर सोडविण्याकरीता ही लाच मागितल्याची माहिती आहे. 

दरम्यान, या प्रकरणाबाबत सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे सेलू येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाल यांनी मागितलेल्या दीड कोटी रुपयांच्या लाचेच्या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या जिल्ह्यातील आणखी एका अधिकार्‍याविरुध्द केलेल्या या धाडसी कारवाईने जिल्ह्यातील प्रशासकीय विभागात मोठी खळबळ उडाली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या