💥पुर्णा तालुक्यातील मौ.सुकी येथील महसुल प्रशासनाने जप्त केलेल्या ८८ ब्रास शासकीय रेतीसाठ्याची परस्पर चोरून विक्री...!

💥मंडळ अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून २ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी प्रकरणी ८ जनांवर गुन्हे दाखल💥

पुर्णा (दि.११ ऑगस्ट २०२१) - तालुक्यातील मौ.सुकी येथील पुर्णानदीतून रेती तस्करांनी अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून विक्रीच्या उद्देशाने साठवलेला अवैध ८८ ब्रास रेतीसाठा महसुल प्रशासनाने जुन महिण्यापुर्वी रितसर पंचनामा करीत जप्त करण्याची कारवाई केली होती सदरील जप्तीतील ८८ ब्रास शासकीय रेतीसाठा ज्याची किंमत २ लाख ६४ हजार रुपये असून हा शासकीय रेती साठा याच सुकी गावातील काही लोकांनी परस्पर चोरी करुन दि.२ जुन ते २४ जुन २०२१ या कालावधीत विक्री केल्याची गंभीर बाब महसुल प्रशासनाच्या तब्बल दिड महिण्याच्या कालावधीनंतर निदर्शनास आली.

या शासकीय गौण-खनिज रेतीसाठा चोरी प्रकरणी मंडळ अधिकारी विशाल सोपानराव शिंदे यांनी काल मंगळवार दि.१० ऑगस्ट २०२१ रोजी पुर्णा पोलिस स्थानकात रितसर तक्रार दाखल केल्याने या घटनेतील व्यंकटी काळबांडे,संदिप काळबांडे,हनुमान काळबांडे,डिगांबर काळबांडे,ज्ञानोबा काळबांडे,नितीन काळबांडे,बंडू काळबांडे,प्रकाश रणवीर राहणार सर्व सुकी या आठ आरोपींच्या विरोधात गुरनं.२९७/२०२१ कलम ३७९,३४ भादवीसह कलम ४८(७)(८) गौण-खनिज कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.दिनेश मुळे हे करीत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या