💥आदरणीय महामहिम राज्यपाल महोदय श्री कोशियारी आपले धन्यवाद व आभार.....!


💥राज्यपाल महोदय कोशियारी साहेबांचा शासकीय प्रोटोकॉल बाजूला सोडत सर्वसामान्य जनमानसाची थेट संवाद साधला💥

💥लेखक: सतीश सातोनकर नानलपेठ परभणी

 समाजशास्त्र,राज्यशास्त्र, आणि मानसशास्त्र या तिन्ही शास्त्रांमध्ये  एकच साम्यता आहे... जगातील कोणत्याही संस्कृतीच्या  उदरामध्ये दडलेल्या  दृढ पारंपारिक मानवीय श्रद्धेला राज्यसत्ता जेव्हा सन्मान देते आणि पावित्र्य  कायम राखते त्यासाठी  सत्तेच्या शीर्ष स्थानावर आरूढ असलेल्या  सन्माननीय व्यक्ती ती प्रचंड आदरास पात्र ठरते......

 परभणी हिंगोली  जिल्ह्याबरोबरच नांदेड येथील महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल महोदय श्री कोशियारी साहेबांचा शासकीय प्रोटोकॉल बाजूला सोडत सर्वसामान्य  जनमानसाची थेट संवाद साधला.... त्यास जनमानसाचा मिळालेला प्रचंड मोठा प्रतिसाद जनमानसाची निकड त्याची भूक त्याची आवश्यकता व त्याकडे त्या त्या जिल्ह्यातील सत्ताधीश लोकांकडून थोडेसे दुर्लक्ष झाल्याचे या दौऱ्यातील प्रतिसादावरून लक्षात येते....

मराठवाडा हा तसा प्रचंड अस्वस्थ आहे.... ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत सामिल होऊन तिकीट मिळवून मंत्री झालेले अब्दुल सत्तार यांच्या कार्यप्रणालीवर औरंगाबाद सन्माननीय हायकोर्टाने सुनावलेला निकाल.........

तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये  काही अपवाद सोडले तर बहुतांशी प्रमोट state cadre officer यांना जिल्हाधिकारी म्हणून बसवण्यात आले..... हिंगोली परभणी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आयएएस अधिकाऱ्यांना काय वागणूक मिळाली व पुढे काय झाले..... 

 झाला प्रकार देशाने स्वतःला आधुनिक म्हणवून घेणाऱ्या पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात घडले हे अनुभवले व पाहिजे.....दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री जगताप यांच्याबद्दल न्यायव्यवस्थेला हस्तक्षेप करून संबंधित अधिकारी याबद्दल काय निकाल दिला आहे व त्यामुळे शासनाची  प्रशासकीय बाजू लंगडी ठरली आहे.....

"पश्चिम महाराष्ट्रातील राज्यप्रमुखांसाठी मराठवाडा एक राजकीय प्रयोगशाळा राहिली आहे. मराठवाड्यातील श्रद्धेला सुद्धा त्यांनी  मराठवाड्याच्या प्रत्येक श्रद्धेला अवस्थेला त्यांनी सुधारणेच्या नावाखाली पुरोगामित्वाच्या नावाखाली पार आसमान दाखवले.....

 मायबाप जनतेनेही त्यांना त्यांची किंमत दाखवून दिलेली आहे.....येणे केले प्रकारे मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून संपूर्ण नियंत्रित लोकशाही राबवण्याचा काही लोक प्रयत्न करत  आहेत.

  खरेतर लोकशाहीच्या माध्यमातून सत्तेचे विकेंद्रीकरण होण्याऐवजी काही लोकांनी सत्ता आपल्या कुटुंबाच्या अंकित ठेवली आहे..... आणि त्यांनी "मराठवाड्यातील जनता म्हणजे गिनिपिक म्हणून त्यांच्यावर प्रयोग करायला सुरुवात केली मागच्या 70 वर्षांपासून अव्याहतपणे प्रयोग आणि प्रयोग" .....

 युद्ध शास्त्रामध्ये निपून योद्धा आपल्या राज्यात कधीच लढाई होऊ देत नाही लढाईसाठी तो आपल्या राज्याबाहेरील भूमी चा उपयोग युद्धभूमी म्हणून करतात... त्यास युद्ध शास्त्रांमध्ये buffer State , buffer war land or zone असेही म्हणतात....

 त्यामुळे जाणत्या  राजकारणी मालकांनी मराठवाडा ही भूमी युद्धभूमी म्हणून निवडली....

 आजही राजकारणातील प्रयोगशाळा म्हणून मराठवाड्यातील व्यक्तींचा प्रदेशाचा उपयोग केल्या जातो...

 परंतु महामहिम राज्यपाल आदरणीय कोशियारी जी यांनी हिंगोली परभणी व नांदेड जिल्ह्यात श्री.गुरुगोविंद सिंग जी महाराज यांच्या गुरुद्वारामध्ये माथा टेकत त्यांच्या सेवेबद्दल विनम्र आभार मानले....

 तर हिंगोली येथे कोणालाही न सांगता अटकेपार भगवा ध्वज फडकवणारे एकमेव मराठी संत श्री नामदेव महाराज यांची जन्मभूमी श्री नरसी नामदेव.... या गावी जाऊन मंदिराच्या बाहेर पायरीवर माथा टेकला पांडुरंग सुखावला,भागवत धर्मी सुखावले, भागवत धर्माची भगवी पताका आनंदाने प्रफुल्लित होऊन फडफडू लागली... माझ्या ऐकण्यात अथवा आठवणीमध्ये महाराष्ट्रातील आज सत्तेत असलेले सत्ताधीश कधीही नरसी नामदेव येथे जाऊन आपला माथा टेकल्या चे पाहिलेही नाही आईकले हि नाही....... महाराष्ट्र राज्याचे सरकार प्रमुख म्हणून घटनादत्त अधिकारी पुरुष  म्हणून मायबाप सरकार विसरून गेलेले कार्य महामहिम राज्यपाल महोदय  आदरणीय कोशियारी साहेबांनी अगदी भक्तिभावाने पूर्ण केले..... 1992-93 पासून शिवसेनेचे तत्कालीन तालुकाप्रमुख वारकरी कुटुंबातील माजी आमदार गजानन रावजी घुगे हे आमचे जुने सहकारी नेते व आदर्श मित्र यांनी सतत बारा वर्ष नामदेव महाराजांच्या इथे सप्ताह साजरा केला व लाख लाख लोकांना प्रसाद चाखण्याचा आनंद दिला... सप्ताह साजरा केला अगदी बारा वर्ष अव्याहतपणे त्याकाळी ते आमदार नव्हते शिवसेनेचे तालुका प्रमुख पुढे त्यांनी मंदिर निर्मितीमध्ये ही मोठा वाटा दिला पाणी पिण्याची व्यवस्था केली.... त्याअगोदर नरसी नामदेव मध्ये ऊन पडलं तर झाडा खाली थांबावं लागायचं पाऊस पडला तर छत्री घ्यावी  लागायची बचाव करण्यासाठी आश्रयासाठी जागा नव्हती.... आजचे वैभव उभारण्या मध्ये वारकरी संप्रदायाचे माजी आमदार श्री गजाननराव घुगे यांचा सिंहाचा वाटा आहे..... आणि आज नरसी नामदेव येथे श्री संत  नामदेव महाराज यांच्या पायरीवर माथा टेकण्यासाठी राज्यपाल महोदय आले असता त्यांच्या सोबतीला योगायोगाने  माजी आमदार गजाननराव घुगे साहेबही होते....

 मी आदरणीय माजी आमदार गजाननराव घुगे साहेब यांची नरसी च्या नामदेव महाराजांवरची भक्ती पाहिलेली अनुभवलेली आहे.,.......

  तथाकथित  सेक्युलर राज्यकर्त्यांना महाराष्ट्राचा भागवत धर्माचे वसंत महात्म्यांचे वावडे आहे..... त्यामुळे त्यांनी कधीही वारकरी संप्रदायाची आस्था असलेल्या परमपूज्य ठिकाणी जाण्याची तसदी घेतली नाही....

 तरीही पन्नाशी वर आऊट होऊन संचुरी मारल्याचे सुख ते सत्तेच्या माध्यमातून भोगत आहेत....

 राज्याच्या मंत्रिमंडळाने जे काम करायला पाहिजे होते ते परम कर्तव्य  महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल महोदय आदरणीय कोशियारी साहेबांनी अत्यंत श्रद्धेने व विश्वासाने निष्ठापूर्वक पार पाडले मराठवाड्यातील जनतेच्या वतीने मित्रांचे कोटी कोटी धन्यवाद व आभार मानतो......

 वारकरी संप्रदाय कुठला राजकारणात वा राजकीय पक्षाचा आदेश मानत नाही तो भागवत धर्माची भगवत चिंतनाची भगवी पताका फडकवितो अगदी श्रद्धापूर्वक नतमस्तक होत आम्ही तेथेच आभार व्यक्त करण्याचे कार्य भाग पूर्ण करत आहोत राजकीय तुच्छ भिंतींच्या पलीकडे...... .

 धन्यवाद भावनांचा स्वीकार व्हावा.......

लेखक: सतीश सातोनकर नानलपेठ परभणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या