💥स्वातंत्र्याच्या ७५ व्या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या विविध घोषणा...!


💥७५ वंदे भारत ट्रेन,देशाच्या विकासासाठी  १०० लाख कोटींची गतीशक्ती योजना💥

💥महिलांसाठी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म योजना ; २०२४ पर्यंत रेशन दुकानांवर पौष्टिकतांदूळ💥 

💥नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनची स्थापना ; मुलींसाठी सैनिकी शाळा खुल्या💥                                          

✍️ मोहन चौकेकर

पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडवून आज अनेक घोषणा केल्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या ७५ आठवड्यांमध्ये ७५ वंदे भारत ट्रेन देशाच्या कानाकोपऱ्याला जोडतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी केली. भारताची विकास यात्रा सुरू करण्याची वेळ आली आहे. या विकास यात्रेची आता सुरुवात करून, पुढील २५ वर्षांचा प्रवास हा नवीन भारताच्या निर्मितीचा अमृत काळ आहे. या अमृत काळात आमच्या संकल्पांची पूर्तता आपल्याला स्वातंत्र्याच्या १०० वर्षांपर्यंत घेऊन जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र  मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी आपल्या भाषणात कोणत्या नवीन घोषणा केल्या ते पाहूया...

💥मुलींसाठी सैनिकी शाळांची कवाडे उघडणार💥

सर्व सैनिका शाळांची कवाडं आता मुलींसाठीही उघण्यात येतील. देशात सध्या ३३ सैनिकी शाळा आहेत. अडीच वर्षांपूर्वी मिझोराममध्ये मुलींना सैनिका शाळेत प्रवेश देण्याचा प्रयोग केला गेला. आता देशातील सर्व सैनिकी शाळांची कवाडं मुलांसाठी खुली केली जातील, असं पंतप्रधान नरेंद्र  मोदी म्हणाले.

💥स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त ७५ वंदे भारत ट्रेन💥

देश आज स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. आता ७५ आठवड्यांच्या आत ७५ वंदे भारत ट्रेन चालवल्या जातील, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. या ट्रेन देशाच्या कानाकोपऱ्याला जोडतील. देशात ज्या वेगाने नवीन विमानतळे बांधली जात आहेत आणि उडाण योजना दुर्गम भागांना हवाई मार्गाने जोडत आहे, ती देखील अभूतपूर्व आहे, असं ते म्हणाले.

💥पंतप्रधान गतीशक्ती योजना सुरू करणार💥

 पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधांवर भर दिला. पंतप्रधान गतीशक्ती योजना सुरू करण्यात येईल. १०० लाख कोटी रुपयांहून अधिकच्या योजनांमुळे तरुणांसाठी रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होतील. पंतप्रधान गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन हा औद्योगिक उलाढालीला चालना देणं आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणारा असेल.

💥नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन💥 

 ग्रीन हायड्रोजनचे जागतिक केंद्र आणि सर्वात मोठा निर्यातदार बनण्यासाठी राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची स्थापना करण्याची घोषणा पीएम मोदींनी केली. स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी देश ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी झाला पाहिजे, असा संकल्प पंतप्रधान मोदींनी सोडला. देशाची प्रगती आणि स्वावलंबी होण्यासाठी ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होणं गरजेचं आहे. देश अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात वेगाने वाटचाल करत आहे आणि या क्षेत्रातील ऊर्जा क्षमता एक लाख मेगावॅटच्या वर गेली आहे, असंही पंतप्रधान म्हणाले. देशाने २०२२ पर्यंत १,७५,००० मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता गाठण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे, असं मोदींनी सांगितलं.

💥महिलांसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म💥 

देशात ८ कोटीहून अधिक गावातील महिला बचत गटांशी जुळल्या आहेत आणि त्या एकहून अधिक उत्पादनांची निर्मती करतात. त्यांच्या उत्पादनांना देशात आणि विदेशात मोठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सरकार आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करेल, अशी घोषणा पीएम मोदींनी केली.

💥२०२४ पर्यंत रेशन दुकानांवर पौष्टिक तांदूळ💥

सरकार कुपोषणाच्या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. याअंतर्गत मध्यान्ह भोजन यासारख्या विविध योजनांद्वारे गरिबांना वितरित करण्यात येणारा तांदूळ पौष्टिक ( फोर्टिफाइड ) केला जाईल. सरकार आपल्या विविध योजनांतर्गत जे तांदूळ गरीबांना देते, ते आता पौष्टिक तांदूळ देईल. रेशन दुकानातून दिला जाणारा तांदूळ असो की मध्यान्ह भोजणासाठी दिला जाणारा तांदूळ, २०२४ पर्यंत प्रत्येक योजनेद्वारे दिला जाणारा तांदूळ हा पौष्टिक केला जाईल.

💥खेळात तंत्रज्ञान आणि व्यावसायिकता आणण्यासाठी प्रयत्न💥

 भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. याबद्दल पंतप्रधान मोदींनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. ऑलिम्पिक खेळलेल्या खेळाडूंनी सर्वांची मनं जिंकली. तसंच त्यांनी नव्या पिढ्यांना प्रेरणा देण्याचं मोठं काम केलं. खेळांमध्ये प्रतिभा, तंत्रज्ञान आणि व्यावसायिकता आणण्यासाठी सुरू असलेली मोहीम अधिक तीव्र आणि व्यापक करावी लागेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.....

✍️ *मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या