💥बिड जिल्हा पोलिस अधीक्षकाकडून सिरसाळा पोलिस ठाण्याला चार मोटार सायकली वाटप...!


💥जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलिस दलासाठी 151 मोटार सायकल वाहनाचे लोकार्पण करण्यात आले💥

सिरसाळा प्रतिनिधी

नुकत्याच पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलिस दलासाठी 151 मोटार सायकल वाहनाचे लोकार्पण करण्यात आले होते ही सर्व वाहने जिल्ह्यातील प्रत्येक ठाण्यात देण्याचे ठरवल्यानतर आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी सिरसाळा पोलिस स्टेशन येथे 4 मोटार सायकल वाटप करण्यात आले या मोटार सायकल चे पूजन सिरसाळा पोलिस स्टेशनचे सहा पोलिस निरीक्षक प्रदिप एकशिंगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रदिप एकशिंगे महनाले की ह्या मोटार सायकल मुळे पोलिस दलास अधीक सक्षम व दक्ष करण्यात निश्चित उपयोगी पडतील याच बरोबर गुन्हेगारीवर पोलिसांचा धाक निर्माण व्हावा जनतेला सुरक्षित असल्याची जाणीव निर्माण करणारे वातावरण तयार करू प्रत्येक बीट मध्ये महीला अमलदर नेमून काम करणार असल्याचे बोलून जील्हा पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या मोटार सायकल वाटपा बद्दल आभार व्यक्त करण्यात यावेळी महीला व पोलिस कर्मचारी उपस्थित होते दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षकांनी मोटार सायकल वाटप केलेत परंतु सिरसाळा पोलिस ठाण्याला अपुरे कर्मचारी असल्याने काम करण्यास अडचण निर्माण होत आहे मोटार सायकल गाड्या दिल्या आहेत परंतु त्यावर बसायला कर्मचारी पण दीले पाहिजे अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या