💥नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस मध्ये विसरलेली बॅग शोधण्यात अखेर यश....!


💥रेल्वे प्रवासी सेनेच्या बहाद्दरांच्या असंख्य कर्तृत्वात आणखी एका कौतुकास्पद कर्तृत्वाची भर💥

लासूर 1 ऑगस्ट 21

औरंगाबाद ; नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेसने औरंगाबाद येथून लासूर असा प्रवास करणाऱ्या सौ.भाग्यश्री कुलकर्णी या महिला प्रवासी लासूर येथे उतरल्या तपोवन एक्सप्रेस लासूर हुन मुंबई कडे निघून गेली तपोवन एक्सप्रेसच्या डि-३ मधील ४९ क्रमांकाच्या सीटच्या खिडकी वरील हुकास बॅग (मंगळा गौर) साठी खरेदी व मौल्यवान वस्तू सह विसरून तशीच राहिली दरम्यान या बॅग विषयी माहिती सौ भाग्यश्री यांनी रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना बॅग वर्णन व सामायन विषयी माहिती दिली

सदरील घटनेची माहिती रेल्वे सेना गोल्डन ग्रुप सदस्य रामा वाघमारे यांना देण्यात आली यावरून रामा वाघमारे यांनी शोधून त्याचा फोटो व्हाट्सएपच्या माध्यमातून पाठवला सौ कुलकर्णी यांनी बॅग ओळखली ही बॅग रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी रेल्वे सेना गोल्डन ग्रुप रामा वाघमारे यांनी हस्तगत करून लासूर स्टेशन मास्तर कमल श्रीवास्तव यांच्या हस्ते सौ.कुलकर्णी यांना परत केली.

रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमानी व त्यांच्या प्रवासी सेनेतील सदस्यांनी यापुर्वी सुध्दा अश्याच प्रकारे प्रवासी वर्गाच्या मदतीला धावून त्यांना वेळोवेळी सहकार्य केल्याच्या तसेच त्यांच्या हरवलेल्या बॅग मौल्यवान वस्तू मोबाईल वापस केल्याच्या घटना समोर आल्या असून रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष सोमानी व त्यांचे सहकारी सदस्य यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून त्यांच्या या कार्याला शतशः प्रणाम....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या