💥माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत व लायन्स क्लब मिडटाऊन नांदेड यांची जांभूळ बेटला सदिच्छा भेट...!


💥जांभूळ बेट मराठवाडातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव निसर्गरम्य पर्यटनस्थळ असल्याने याच्या संवर्धनाची गरज - डि.पी.सावंत 

✍🏻विनोद कांबळे

पालम :- सविस्तर माहिती अशी कि दि. ०८ ऑगष्ट रोजी मराठवाड्यातील एकमेव निसर्ग बेट असलेले परभणी जिल्हा पालम तालुक्यातील जांभूळबेट येथे माजी राज्यमंत्री माननीय डी.पी. सावंत साहेब तसेच लायन्स क्लब मिडटाउन नांदेड चे अध्यक्ष सुरेंद्र कदम,सचिव विश्वजित राठोड,कोषाध्यक्ष सर्ताजसिंग कंधारवाले व त्यांचे सर्व सदस्य यांनी जांभूळ बेट या निसर्गरम्य बेटावर सहकुटुंब दिनांक 08/08/2021 रोजी सदिच्छ दिली


सोमेश्वर येथील जांभूळ बेटावर व तीर्थक्षेत्र प्राचिन सोमनाथ महादेव मंदिर ता. पालम जि. परभणी येथे आले असता त्यांचे जांभूळ बेट संवर्धन समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यावेळी भाई लक्ष्मणराव गोळेगावकर, प्राचार्य डॉ. आत्माराम आरसुळे, वृक्षमित्र फाउंडेशन नांदेडचे संतोष मुगटकर व भराडिया सर,राम कदम उपसरपंच ग्रामपंचायत घोडा-सोमेश्वर, विजय होकर्णे सर , सम्यक वर्तमानकाळ पेपरचे संपादक विनोद कांबळे , डॉ.अमोल लांडगे, वृक्षमित्र गोविंद दुधाटे,प्राध्यापक निळकंट लांडे, इंजिनिअर देवानंद हत्तीअंबीरे, लखन लांडे, आदिनाथ चांदणे, अनिल पौल, अंगद लांडे,शिवराम लांडे, प्रल्हाद लांडे, मुकुंद महाराज, पांडुरंग पौल, संदीप दुधाटे , व तालुक्यातील व आजुबाजूच्या परिसरातील नागरिक निसर्ग प्रेमी आदी उपस्थित होते.

त्यानंतर सावंत साहेब व लायन्स क्लबच्या सदस्यांनी बेटाची पाहणी केली व त्याठिकाणी वृक्ष लागवड हि त्यांनी केली.  जांभूळ बेट संवर्धन समितीच्या वतीने सर्वांसाठी वानभोजनाची व्यवस्था करण्यात अलीहोती त्याचा सर्वांनी आस्वाद घेतला. त्यानंतर उपस्थिताना मार्गदर्शन करताना सावंत साहेब म्हणाले कि मराठवाड्यातील न्हवे तर संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव असे हे निसर्ग बेट जांभूळ बेट आहे आणि हे इतके वर्ष याच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलेले आहे मात्र आता याच्या संवर्धनाची गरज आहे व हे बेट लोप पावता कामा नय यासाठी सर्वांनी सरोत्परी प्रयत्न सर्वांनी केले पाहिजे. पुढे बोलतानी म्हणाले कि जेवढे होईल तेवढी मदत आम्ही करू असे आश्वासन हि त्यांनी दिले. त्यानंतर लायन्स क्लबचे अध्येक्ष सुरेंद्र कदम सराणी मार्गदर्शन केले त्यांनी, जांभूळ बेटाला उजाळादेत म्हणाले कि इतके वर्ष दुर्लक्षित असलेले हे निसर्गरम्य बेटाला खरी गरज हि संवर्धनाची आहे त्यासाठी सर्व निसर्ग प्रेमी पक्षी प्रेमी सर्व सामाजिक संस्था यांनी याठिकाणी भेटी देऊन होईल तेवढी मदत करून याला वाचवले पाहिजे व पुढच्या पिढीला हा वारसा दिला पाहिजे. त्यांनी यावेळी लायन्स क्लबच्या वतीने बेटाला लहान मुलांची खेळण्याची खेळणी यावेळी भेट म्हणून जाहीर केली. त्यानंतर जांभूळ बेट संवर्धन समितीच्या वातीले सर्वांचे जांभूळ बेटला भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या