💥'गंगा-जमुना वस्तीवर कारवाई अयोग्य ; अरुणा सबाने यांचे मत....!


💥नागरिक मंचद्वारे आयोजित ‘वेश्या व्यवसाय अवैध की बेकायदेशीर’ या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या💥

नागपूर : शहरात देहविक्री करणाऱ्या महिलांची वस्ती ‘गंगा जमुना’ येथील महिलांवर पोलिसांनी केलेली कारवाई अयोग्य असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यां व ज्येष्ठ लेखिका अरुणा सबाने यांनी व्यक्त केले नागरिक मंचद्वारे आयोजित ‘वेश्या व्यवसाय अवैध की बेकायदेशीर’ या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या व्यासपीठावर कामगार नेते व मंचचे संयोजक भाई जम्मू आनंद, अ‍ॅड. निहालसिंह राठोड व सामाजिक कार्यकर्त्यां हेमलता लोहावे उपस्थित होते. 


करोनामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान प्रभावित झाले आहे अनेकांचा रोजगार गेला आर्थिक समस्या निर्माण झाल्या अशा काळात वरील वस्तीतील महिलांच्या घराला कुलूप ठोकणे, त्यांना घरातून बाहेर काढणे हा प्रकार अमानवीय आहे पोलीस कोणाच्या तरी इशाऱ्यावरून ही कारवाई करीत असल्याचे स्पष्ट होते असा आरोपही सबाने यांनी यावेळी केला. 

या भागातील महिलांनी कुठलीही भीती न बाळगता या कारवाईला विरोध केला लोकांनीही त्यांच्या संघर्षांला पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले अ‍ॅड.राठोड म्हणाले मागील अनेक वर्षांत पोलिसांनी येथून देयविक्री करणाऱ्या अल्पवयीन मुलींची सुटका केली. पण त्यांचे पुनर्वसन न केल्याने त्यांना पुन्हा या व्यवसायात यावे लागले वारंवार होणाऱ्या पोलीस कारवाईमुळे अनेक मुलींची मानसिक आरोग्य बिघडले आहे. अल्पवयीन मुली या व्यवसायात येऊ नये हे पाहण्याचे पोलिसांचे काम आहे.

पण त्यांना तेथून मुक्त करण्याच्या नावाखाली महिलांच्या हक्कावर ते गदा आणू शकत नाही हेमलता लोहावे म्हणाल्या मागील वीस वर्षांपासून या वस्तीत रेड क्रॉस सोसायटीतर्फे एड्स प्रतिबंधक उपाययोजनांचे काम करीत आहे महिलांची मुले शाळेत जात आहेत त्यांच्याकडे सकारात्मक भूमिकेने बघण्याची गरज आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या