💥पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 585 गरजूंना मोफत श्रवणयंत्राचे होणार वाटप....!


💥डिजिटल श्रवणयंत्र शिबीरात तपासणी झालेल्या गरजूंना शिबीरात होणार वाटप - डॉ. संतोष मुंडे 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पुर्वतपासणी झालेल्या 585 गरजू व्यक्तींनासाठी अंदाजे 25 हजार रुपये किंमतीच्या मोफत डिजिटल  श्रवणयंत्र (कानाची मशीन) वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पुर्व तपासणी झालेल्या रूग्णांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून उपस्थित राहावे असे आवाहन शिबीराचे संपर्क प्रमुख डॉ.संतोष मुंडे यांनी केले आहे. 


शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराजरंग मंदिर येथे  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दि.14, 15 व 16 आँगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जिल्हा आरोग्य विभाग, बीड, नाथ प्रतिष्ठान, परळी वैजनाथ, धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व स्टारकी फाऊंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून 585 प्रत्येक व्यक्तीसाठी  अंदाजे 25 हजार रूपये किंमतीच्या मोफत डिजिटल श्रवणयंत्र (कनाची मशीन) वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.  दिनांक 6 व 7 मार्च 2020  रोजी झालेल्या कर्णबधिर रुग्णांच्या मोफत डिजिटल श्रावण यंत्र वाटप पूर्व तपासणी शिबिरात परळी तालुका व परिसरातील सुमारे चारशे 1842 कर्णबधिर रूग्णांनी लाभ घेतला होता.  त्यामध्ये 585 कर्णबधिर मोफत श्रवणयंत्राचे वाटप करण्यात येणार आहे. दि. 6 व 7 मार्च 2020 रोजीच्या शिबीरात तपासणी झालेल्या अशाच गरजुवंतांना मोफत श्रवण यंत्र वाटप करण्यात होणार  आहे. तरी मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपाचा गरजुवंतांनी लाभ घ्यावा तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळून या लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे अध्यक्ष तथा शिबीराचे संपर्क प्रमुख  डॉ.संतोष मुंडे (9822280568) यांनी केले आहे.,..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या