💥'स्वातंत्र्य दिनाच्या' पूर्वसंध्येला 4 निराधार विधवा ताईंना उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीन देणार...!


💥होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेचा कौतुकास्पद उपक्रम💥

परभणी (दि 14 ऑगस्ट 2021) - स्वातंत्र्य दिनाच्या' पूर्वसंध्येला होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थे तर्फे 4 निराधार, दुर्धर आजारग्रस्त व विधवा महिलांना उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीन देऊन मदत करण्यात आली.  


परभणी शहरातील एआरटी विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय  येथे जिल्ह्यातील एचआयव्ही ग्रस्त रुग्णांना शासनाकडून मोफत औषधोपचार दिला जातो. परंतु एचआयव्ही एड्स मुळे आई वडिलांच्या मृत्यूनंतर अनाथ झालेल्या मुलांचा विशेषतः 18 वर्ष पूर्ण झालेल्या बालकांचा स्वयंरोजगार व प्रशिक्षण चा प्रश्न बिकट आहे. शिवाय पतीच्या मृत्यूनंतर विधवा झालेल्या एड्सग्रस्त महिलांचा उदरनिर्वाचा प्रश्न बिकट आहे. अशा प्रसंगी त्यांना स्वतःच्या पायावर स्वावलंबी बनवून, स्वयंरोजगार व प्रशिक्षण द्वारे मदत देणे गरजेचे आहे.  यात एचएआरसी संस्थे तर्फे  आजवर 20 ज्यात 3 संस्थात्मक व 17 वैयक्तिक पातळीवर गरजू निराधार ताईंना एचएआरसी तर्फे शिलाई मशीन व पिको फॉल मशीन देऊन मदत केली आहे. तसेच ग्रामीण भागात डाळ काढायचा व्यवसाय चांगला चालतो त्या अनुषंगाने 1 विधवा ताईला डाळ काढायची गिरणी दिली आहे. 

या प्रसंगी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक यांनी  एचआयव्ही व अनाथांसाठी एचएआरसी संस्थेच्या विविध उपक्रमांविषयी माहिती देताना म्हणाले " समाजातील दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना स्वावलंबी होण्यासाठी व स्वयंरोजगार व प्रशिक्षन साठी जी पण भविष्यात मदत लागेल ती एचएआरसी संस्थेतर्फे पुरविली जाईल.सर्व रुग्णांनी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन नियमितपणे उपचार, पोषक व संतुलित आहार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्या सुख दुःखात एचएआरसी संस्था सदैव आपल्या सोबत आहे".

आज स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला एआरटी विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार घेणाऱ्या अत्यंत गरजू अशा 4 एचआयव्ही एड्सग्रस्त निराधार विधवा ताईंना उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीन देण्यात आल्या. या प्रसंगी नोडल ऑफिसर डॉ संजय मस्के,  एआरटी विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ सौ मंजुषा कुलकर्णी, डॉ मार्डीकर, डॉ पालवे, समुपदेशक अनुराधा बेर्डे, सुरेखा जाधव, विशाल कापबोईना, चव्हाण, गलांडे, जोशी, आदमाने आदी स्टाफ उपस्थित होते. 

या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी  एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, डॉ सौ आशा चांडक, प्रा शिवा आयथळ, प्रा पद्मा भालेराव, प्रा अंजली जोशी, अतुल जावळे, डॉ निखिल केंद्रेकर, राजेश्वर वासलवार, संजय धर्माधिकारी, प्रा सुभाष काळे, राजेंद्र महाजन यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या