💥राज्य सरकारने जाहीर केली पूरग्रस्तांसाठी 11500 कोटींच्या पॅकेजची मदत घोषित...!

       


💥पूरग्रस्त भागातील मदत, दुरुस्तीसह दीर्घकालीन उपाययोजनांसाठी 11,500 कोटींच्या पॅकेजला मंत्री मंडळाची मंजुरी💥 

✍️  मोहन चौकेकर 

राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच, वित्तहानी झाली या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून पूरग्रस्त भागातील मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी तब्बल 11,500 कोटींच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे.

 💥एवढी मिळणार मदत ;-

▪️सानुग्रह अनुदान म्हणून प्रतिकुटुंब NDRFच्या निकषांच्या पुढे जाऊन 10,000 रुपये करण्यात आली आहे. दुकानदारांसाठी 50,000 तर टपरी धारकांसाठी 10,000 रुपयांची मदत देण्यात येणार._

▪️पूर्ण घर पडलं असल्यास 1.5 लाख रुपये, 50% नुकसान झालेल्या घरासाठी 50,000 रुपये, 25% नुकसान झालेल्या घरासाठी 25,000 तर अंशत: नुकसान झालेल्या घरासाठी 15,000 रुपये देण्यात येणार._

▪️तसेच सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 2,500 कोटी रुपये तर 4,400 प्राण्यांचा या आपत्तीमध्ये मृत्यू झाला आहे. त्यासाठी 60 कोटींची वेगळी रक्कम जाहीर करण्यात आली आहे._

▪️पूर्णपणे घर नष्ट झालेल्या लोकांसाठी दीड लाखाची तरतूद आहे. म्हाडाकडून साडेचार लाख रुपये किंमतीची घरं पूरग्रस्तांसाठी उभारली जाणार असून त्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे._

दरम्यान, या निर्णयांची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होणार असून नुकसान झालेल्या बागायती व जिरायती शेतजमिनींसाठीचा निर्णय सविस्तर जाहीर करण्यात येतील....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या