💥करोना नियमांच्या उल्लंघनामुळे रेल्वे कंत्राटदाराला ५० हजार रुपयांचा दंड...!


💥रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना प्रवाशाने ट्वीट केल्यावर त्यांनी संबंधित कंत्राटदारा विरोधात केली कारवाई💥

मुंबई: रेल्वेगाडीत कर्मचाऱ्यांकडून करोना नियमांचे उल्लंघन आणि धूम्रपान करून प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आणल्याचा प्रकार रामनगर ते वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेसमध्ये उघडकीस आला आहे या प्रकरणी एका जागरूक प्रवाशाने गाडीत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चित्रीकरण आणि छायाचित्र काढून ही माहिती थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनाच ट्वीट केली याची दखल घेऊन रेल्वेमंत्र्यांनी संबंधित कंत्राटदारावर कारवाईचे आदेश दिले त्यानुसार आय.आर.सी.टी.सी (इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन) अधिकारी व रेल्वे पोलिसांनी गाडीत प्रवेश करून कंत्राटदाराला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होशियार सिंह दसोनी हे वसईत राहतात काही कामानिमित्त ते उत्तराखंडमध्ये गेले होते. 


मुंबईला येताना त्यांनी  सायंकाळी ६.३० वाजता रामनगर ते वांद्रे टर्मिनस गाडी लाल कुआ स्थानकातून पकडली वातानुकूलित डब्यातून ते प्रवास करत होते त्यांना गाडीत पाणी तसेच खाद्यपदार्थ देणारे कंत्राटदाराचे कर्मचारी मास्क (मुखपट्टी) शिवायफिरत असल्याचे आढळले त्यांनी या कर्मचाऱ्यांना मास्क (मुखपट्टी) बाबत विनंती केली परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले गाडीतील एका कोपऱ्यात बसून तीन ते चार कर्मचारी धूम्रपानही करत होते ही माहिती दसोनी यांनी रात्रीच रेल्वेमंत्र्यांना ट्वीट करून दिली व कारवाई करण्याची मागणी केली. 

त्यानंतर शनिवारी सकाळी रतलामजवळ गाडी थांबताच आय.आर.सी.टी.सी.चे अधिकारी आणि रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी दाखल झाले त्यांनी दसोनी यांची भेट घेतली त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कंत्राटदाराला बोलावून करोना नियमांचे उल्लंघन आणि अन्य नियमावली न पाळल्याने ५० हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या