💥गोंदिया जिल्ह्यातील भडंगा येथील ६१ वर्षीय वयोवृध्द नागरिक वाघाच्या हल्ल्यात ठार...!


💥हल्ल्या ठार झालेले पुनाजी मेश्राम हे गोरेगाव वनपरिक्षेत्रात पिंडकेपार जंगलालगत शेळ्या चारायला गेले होते💥

गोंदिया ; दुपारच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यातील घटना वाघाच्या हल्यात एक वयस्कर नागरीक ठार झाला आहे भंडगां येथे राहणारे पुनाजी मोहन मेश्राम ( ६१ वर्ष) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 पुनाजी मेश्राम हे गोरेगाव वनपरिक्षेत्रात पिंडकेपार जंगलालगत शेळ्या चारायला गेले होते. दरम्यान त्यांच्यावर वाघाने हल्ला केला या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे हा वाघ वाघिण टि -१४ चा बच्चा आहे गेल्या २-३ महिन्यापासून हा वाघ गोरेगाव वनपरिक्षेत्रात क्षेत्रात भ्रमण करीत आहे जंगल क्षेत्रालगत विशेष काळजी घेवून जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत गावकऱ्यांनी यावेळी व्यक्त केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या