💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कामगार नोंदणी आपल्या गावच्या चावडी अभियानास सुरूवात....!


💥आपल्या गावच्या चावडी अभियाना अंतर्गत पिंगळी (बा.) येथे कामगार नोंदणी अभियानाला सुरुवात💥

परभणी- महाराष्ट्र राज्याचे कामगार राज्यमंत्री मा.ना , बच्चुभाऊ कडु यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संपूर्ण जिल्हयामध्ये वर्षभर कामगार नोंदणी आपल्या गावच्या बाबडीवर अभियानांतर्गत कामगारांची ऑनलाईन नोंदणीचा संकल्प केला आहे . त्या निमित्त आज परभणी तालुक्यातील बाजार पिगळी यो प्रहार जनशक्ती पक्ष शाखेच्या वतीने गावामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या बांधकाम मजुर , घरेलु कामगार व आस्थापनांवर काम करणारे कामगार यांच्या ऑनलाईन नोंदणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. 


या कार्यक्रमाआधी प्रहार जनशक्ती पक्ष शाखा पिगळी येथे शाखा कार्यकर्त्यांनी विविध विषयांवर बेठक संपन्न झाली त्यानंतर ऑनलाईन कामगार नोंदणीच्या अर्ज वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन पिंगळी बा.शाखेचे शाखाप्रमुख शंकर दामोधर यांनी केले तर आभार प्रदर्शन शाखा उपाध्यक्ष सुर्यकांत आगलावे यांनी केले . या वेळी गावातील कामगार व कार्यकर्ते मोठया प्रमाणावर उपस्थित होते . उपस्थितांना ब्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी मार्गदर्शन केले व नोंदणीसाठीचा अर्ज कसा भरावा व त्यासाठी कागदपत्रांची सविस्तर माहिती दिली . कार्यक्रमाला प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने , युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे , युवा आघाडी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर , उपशहर प्रमुख पिटु कदम , भास्कर खुपसे , नकुल होगे व दत्तराव रवंदळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंगळी बा . येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवाजी गारोडे , कैलास राष्ट्रकुट , संभाजी दामोधर नवनाथ साबळे , अंगद सुरोसे , योगेश दामोधर , शिवाजी काटकर , सतिश पांचाळ , संतोष बडवणे , शिवम दामोधर , अनिल डुबे , भारत आगलावे , दिपक आगलावे , माऊली आगलावे व देवराव आगलावे आदीने परिश्रम घेतले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या