💥परभणी जिल्ह्यात आज गुरुवार दि.२२ जुलै रोजी नव्याने आढळले ९ कोरोनाबाधीत रुग्ण...!

💥जिल्ह्यात आज गुरुवारी सुदैवाने एकाही कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला नाही💥

परभणी (दि.२२ जुलै २०२१) - परभणी जिल्हात आज गुरुवार दि.२२ जुलै २०२१ रोजी नव्याने ९ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून जिल्ह्यात आज गुरुवारी सुदैवाने एकाही कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला नाही. 

दरम्यान जिल्ह्यात आज गुरुवार दि.२२ जुलै २०२१ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात ९२ कोरोनाबाधीत रुग्ण उपचार घेत असून रुग्णालयात उपचार घेऊन पुर्णपणे बरे झालेल्या ६ कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे तर जिल्ह्यात आजपर्यंत ५११५५ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून यशस्वी उपचारा नंतर आजपर्यंत ४९७७८ कोरोनाबाधीत कोरोनामुक्त झाले आहेत तर जिल्ह्यात आजपर्यंत १२८५ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने एका प्रेसनोट द्वारे कळवले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या