💥वाशिम ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्यावर कार्यवाहीचे सत्र सुरुच...!


💥अवैध दारूविक्री करणारे नऊजन जेरबंद,१९७००/-रुपयाची गावठी दारु जप्त,वाशिम पोलिसदलाची कारवाई💥

वाशिम :- वाशिम ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्यावर कार्यवाहीचे सत्र सुरु असुन पोलीस अधिक्षक श्री वसंत परदेशी व अपर पोलीस अधिक्षक श्री विजय कुमार चव्हाण,उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम केडगे सो,यांचे मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली असुन त्या अंतर्गत ग्राम अढळनगर,रिठद येथे अवैधरित्या चालु असलेल्या गावठी हातभट्टीचे दारु विक्री करणारे तसेच देशी व विदेशी दारु विनापरवाना विक्री करणारे एकुण 9 इसमाविरुध्द धडक कार्यवाही करुन एकुण 19700/- रुपयाची गावठी दारु व सडवा मोहामाच व एकुण 11392/- रुपयाची देशी व विदेशी दारु असा एकुण किमंत 31092 /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन 9 इसमाविरुध्द पो.स्टे. वाशिम ग्रामीण येथे महाराष्ट्र दारु बंदी अधिनियमाचे कलम 65 (ई), (फ) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

सदरची कार्यवाही पो.स्टे. वाशिम ग्रामीण येथील सपोनि श्री विनोंद झळके ठाणेदार वाशिम ग्रामीण,पोउपनी श्री रमेश गलांडे पाटील सोबत पोहवा/274 गजानन सरोदे , पोना/835पोना/813 भानुदास निवाणे पोकॉ/407 रवि जवजांळ, पोकॉ/1385 कैलास बळी,पोकॉ/1322 उमेश देशमुख यांचे पथकाने केली आहे.यापुढे सुध्दा अढळनगर रिठद येथे अवैध धंदे करणाऱ्या इसमा बाबत माहिती मिळाल्यास त्याचेविरुध्द कठोर नियमाप्रमाणे धडक कार्यवाही करुन ग्राम अढळनगर रिठद येथील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहोत असे पोलीसांनी सांगीतले.


प्रतिनीधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या