💥पूरग्रस्तांच्या मदतीसाठी परळीत उद्या भाजपची मदतफेरी ; पंकजाताई मुंडे होणार सहभागी....!


💥गुरुवार दि.२९ जुलै रोजी भाजपच्या वतीने मदतफेरी काढण्यात येणार आहे💥

परळी : राज्यातील विविध भागात आलेल्या पुरामुळे नागरिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांना निधी अथवा वस्तू स्वरूपात मदत करण्यासाठी परळीत येत्या २९ जुलै रोजी भाजपच्या वतीने मदतफेरी काढण्यात येणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे हया या फेरीत स्वतः सहभागी होणार आहेत. 

राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, चिपळूण आदी भागात नुकत्याच झालेल्या महापुरामुळे हजारो लोक बेघर झाले असून जिवित व मालमत्तेचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. अशा  संकटात लोकांना आज मदतीची गरज आहे, त्यामुळे वाढदिवसाच्या कार्यक्रमांवर होणारा खर्च टाळून पूरग्रस्तांना वस्तू स्वरूपात मदत करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. 

गुरूवारी २९ जुलै रोजी सकाळी ९.३० वा. छत्रपती शिवाजी चौक येथून या मदतफेरीस प्रारंभ होणार असून पंकजाताई मुंडे यात सहभागी होणार आहेत. ही मदतफेरी स्टेशन रोड, टाॅवर मार्गे गणेशपार पर्यंत जाणार आहे. या फेरीत नागरिक, व्यापाऱ्यांनी पूरग्रस्तांना वस्तू स्वरूपात मदत करावी तसेच कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले आहे.

••••

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या