💥पुण्यातील "फुकट ‘बिर्याणी’ मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा” - पतित पावन संघटना


💥पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांचा नोंदवला निषेध💥 

पुणे ; स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा धिक्कार असो…अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवला तर याविषयी चौकशी करुन कडक कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.

💥पुणे पोलीस दलात खळबळ माजवणाऱ्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपची गृहमंत्र्यांनी घेतली दखल आयुक्तांना दिला चौकशीचे आदेश💥 

पुणे पोलीस दलातील एका महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे या ऑडिओ क्लिपमध्ये महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याला बिर्याणीची ऑर्डर देत असून फुकटात आणण्यास सांगत आहे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या ऑडिओ क्लिपची दखल घेतली असून आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे. 

पुणे पोलीस अन् बिर्याणी : “ त्या ऑडिओ क्लिपची चौकशी झाली पाहिजे ; हे माझ्या विरुद्धचं षडयंत्र आहे” तर, “ ऑडिओ क्लिपची चौकशी झाली पाहिजे चौकशी होणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतरच जे सत्य आहे ते समोर येईल गृहमंत्र्यांनी याबाबत जे काही सांगितलं आहे, त्या वरून सर्व काही स्पष्ट होईल. 

"हे माझ्या विरुद्धचं षडयंत्र आहे.” असं म्हणत पुण्याच्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी सध्या पुणे पोलीस दलाबाबत चर्चेचा विषय ठरत असलेल्या बिर्याणी प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या