💥जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा भागात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा....!


💥बांदीपोरा भागात जवानांकडून संयुक्त शोधमोहीम सुरू💥 

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा भागात झालेल्या चकमकीत जवानांना मोठे यश मिळाले आहे जवानांनी दहशतवाद्यांचा कट उधळून लावत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे जम्मू-काश्मीर पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली आहे सकाळी बांदीपोरा भागात जवानांकडून संयुक्त शोधमोहीम सुरू करण्यात आली होती बांदीपोरामधील अरागाम-सुलर भागात नुकतच एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं त्या अगोदर दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता त्यामुळे बांदपोरा चकमकीत एकूण तीन दहशतवादी ठार झाले आहेत. 

दरम्यान जवानांकडून परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आलेली आहे या चकमकीत एक जवान जखमी झाला असल्याची देखील माहिती समोर आली असून या जखमी जवानास चकमकीच्या ठिकाणाहून सुरक्षितस्थळी देखील नेण्यात आलं आहे काही माध्यमांकडून या चकमकीत तीन जवान जखमी झाल्याचे सांगितले जात होते मात्र हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगण्यात आले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या