💥पिकविमा पंचनामा व तक्रारीसाठी देण्यात आलेल्या ७२ तासाच्या कालावधीस शिथिलता द्या - प्रहार जनशक्ती पार्टी


💥शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा सरसगट नजर पंचनामा करुन तक्रारी स्वीकारण्यात याव्या -जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने

परभणी - मागील दोन दिवसापासुन परभणी जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणावर पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याशिवाय दुधना प्रकल्पातुन मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने सेलु, मानवत व परभणी तालुक्यातील जवळपास सर्वच मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शिवाय शेतकऱ्यांच्याही शेतात पाणी शिरुन मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे. ही पाश्वभुमी पाहता झालेल्या नुकसानीबाबत पिकविमा कंपन्यांना शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत पंचानाम्यासह ७२ तासाच्या आत तक्रार दाखल करणे आवश्यक आहे.


परंतु दोन दिवसाच्या मोठया पावसामुळे व दुधना प्रकल्पातुन मोठया प्रमाणात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना पिकविमा कंपनीकडे नुकसानीची आपली तक्रार घेऊन जिल्हयाच्या ठिकाणी येणे शक्य होत नाही. त्याशिवाय पिक विमा कंपनीने दिलेला टोल फ्री नंबर बंद येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जिल्हयातील शेतकरी हा हतबल झाला आहे. करिता परभणी जिल्हयामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ सरसगट नजर पंचनामे करुन शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत पिक विमा कंपन्यांनी दिलेल्या 72 तासाच्या कालावधीत शिथिलता द्यावी व झालेल्या नुकसानीबाबत तक्रार स्विकारण्यास अवधी वाढवुन द्यावा याबाबत पिक विमा कंपन्यांना सुचित करावे अशी मागणी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने श्री.दिपक मुगळीकर, जिल्हाधिकारी परभणी यांच्या नावे असलेले निवेदन मा.मंजुषा मुथा, उपजिल्हाधिकरी, परभणी यांची भेट घेऊन त्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच जिल्हयातील सर्व महसुली यंत्रणांना तात्काळ नजर पंचनामा करण्याच्या सूचना द्याव्यात जेणे करुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिकविम्याचा फायदा मिळेल. असे ही या निवेदनात म्हंटले आहे. निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, मानवत तालुका प्रमुख गोविंद मगर, युवा आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, युवा आघाडी उपशहर प्रमुख पिंटु कदम, बालुभाऊ तरवटे, नकुल होगे, वैभव संघई, दत्तराव रौदळे इत्यादी च्या स्वाक्षऱ्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या