💥पुर्णेतील बुद्धविहार येथे आषाढ पौर्णिमेनिमित्त धम्मदेशना सत्कार समारंभाचेचे आयोजन.....!


💥कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बिएसएनएलचे साहाय्यक महाप्रबंधक के.एस.मोरे यांची उपस्थिती💥 

पूर्णा ; येथील बुद्ध विहारात दि.२४ जुलै २०२१ रोजी वर्षावास अधिष्ठान व आषाढ पौर्णिमा निमित्त धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.बुध्द विहाराचे भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या कार्यक्रमात भंते पय्या वंश भन्ते संघरत्न त्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बिएसएनएलचे साहाय्यक महाप्रबंधक के.एस.मोरे,पुर्णेचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष राठोड,दैनिक शिल्पकारचे संपादक सुरेश गायकवाड,पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक सुभाषचंद्र मरकड,अंजनवाडाचे सरपंच किरण घोंगडे,नारायन पिसाळ इत्यादी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमात भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांची प्रमुख धम्मदेशना होणार आहे शनिवार दिनांक २४ जुलै २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान बुद्ध विहार समिती, भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखा पूर्णा व धम्म सेवेमध्ये कार्यरत असलेले निरंजना धम्म सेवाभावी महिला मंडळ, रोहिणी धम्म सेवाभावी महिला मंडळ, आम्रपाली महिला मंडळ, विशाखा महिला मंडळ, तक्षशिला महिला मंडळ, माता रमाई महिला मंडळ पूर्णा यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या