💥परभणीत ११ जुलै २०२१ रोजी झालेल्या पावसा मुळे कॅनाल लगतच्या वस्त्यांतील घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान...!


💥जवाबदार अधिकारी,अभियंता व ठेकेदार यांची चौकशी समिती नेमून चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करा - शिवलिंग बोधने

परभणी - दि. ११ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीत शहरातील अविकानगर, संतसेना नगर, विधास नगर, गुलजार कॉलनी व सरगम कॉलनी या भागात मोठया प्रमाणावर पाणी शिरल्याने नागरीकांच्या घरांमध्ये पाणी शिरुन मोठे आर्थिक नुकसान झाले व जिल्हा प्रशासनावर अनेक कुटुंबाना स्थलांतरीत करुन तात्पुरत्या निवाऱ्यात ठेवण्याची वेळ आली. यात अनेक नागरीकांच्या गृहउपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. 


अतिवृष्टी हि नैसर्गिक असली तरी नागरीकांच्या घरात पाणी शिरुन झालेले नुकसान हे अक्षम्य मानव निर्मित चुकामुळे झाले आहे. कारण वरील कॉलनी व नगरांच्या बाजुने जाणाऱ्या कॅनालवर पुल बांधण्याचे काम परभणी शहर महानगरपालिकेने हाती घेतले होते याच बांधकामासाठी कॅनॉल मध्ये मुरुमाचा भराव टाकण्यात आला होता. पावसाळ्या दरम्यान कधी ही अतिवृष्टी होऊन धरणाचे पाणी सोडल्या जाऊन कॅनोलमध्ये पाणी येण्याची शक्यता लक्षात घेता कनॉलमध्ये भराव टाकणे हे चुक होते परंतू महानगरपालिका अभियंता व ठेकेदार यांनी याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले. शिवाय या पुल बांधकामासाठी तत्कालीन कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग का - ०२ श्री राजेश सरगरकर यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. ते पुर्णतः चुकीचे व बेकायदेशीर असुन कार्यकारी अभियंता यांना कॅनॉलवर पूल बांधण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र अथवा परवानगी देण्याचा कुठलाही अधिकार नाही. कॅनॉल वरील प्रस्ताचित पुलाचे डिझाईन व इस्टिमेंट तपासुन प्रस्तावित पुलाच्या बांधकामामुळे कॅनॉलमधील पाण्याच्या वेगळा काही अडथळा तर होणार नाही. याबाबत सिंचन विभागाचे अधिकारी तपासणी य स्थळ पाहणी करुनच वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवतात व या बाबत मान्यता देण्याचा संपूर्ण अधिकार मुख्य प्रशासक व मुख्य अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण औरंगाबाद यांना आहे असे असतांनाही कॅनॉलच्या पलिकडे होत असलेल्या प्लॉटिंगला भाव येण्यासाठी श्री. राजेश सरगरकर यांनी हे बेकायदेशीर ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्याच बरोबर कॅनॉलवर बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या डिझाईनाला कुठल्याही प्रकारची  अधिकृत मुंजुरी वरिष्ठांकडून देण्यात आलेली नाही. शिवाय सद्यस्थितीत असलेल्या पुलापासुन ५०० मीटरच्या पट्टया त्याच फेनोलवर दुसरा पुल बांधता येत नाही असा नियम आहे तरी हा नवीन प्रस्तावित पुल ५०० मीटर च्या आत येतो. तरी सर्व नियमांची पायमल्ली करीत श्री. राजेश सरगरकर, परभणी शहर महानगरपालिका अभियंता व ठेकदार यांनी आपसात साटलोट करुन केलेल्या चुकीच्या कामामुळेच कॅनॉल लगतच्या नागरीकांचे मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले व त्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला होता. आपणास विनंती आहे की, परभणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने श्री राजेश सरगरकर कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग क्र .2, परभणी शहर महानगरपालिका अभियंता व ठेकेदार यांच्यासह संबंधीत पुल बांधकामाची परवानगी, ना हरकत व कामाची चौकशी करण्यासंदर्भात एक चौकशी समिती नेमावी व शहरातील नागरीकांच्या जिविताशी खेळणाऱ्या बेजबाबदार अधिकारी, अभियंता व ठेकेदारावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी मा. दिपकजी मुगळीकर, जिल्हाधिकारी परभणी यांची पक्षाच्या शिष्ट मंडळासह भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.

जर योग्य वेळी नव्याने रुजू झालेले जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.- २ चे कार्यकारी अभियंता श्री.प्रसाद लांब व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिस्थिती चे गांभीर्य ओळखून यंत्रणा राबवून काम केले नसते तर मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या जिविताचे व मालमत्तेचे नुकसान झाले असते असे ही या निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे व राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री मा.ना. बच्चूभाऊ कडू यांना पाठविण्यात आल्या आहेत निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, युवा आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, उपशहर प्रमुख पिंटू कदम, बालुभाऊ तरवटे, नकुल,वैभव संघई, भास्कर खूपसे, दत्तराव रवंदळे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या