💥जंग-ए-अजिन्युज हेडलाईन्स - दिवसभरातील ठळक घडामोडी थोडक्यात....!


💥राज्यातील पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात पंचवीस टक्के कपात - शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

 ✍️ मोहन चौकेकर

1) मोठी दुर्घटना ; रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये तळीये गावावर दरड कोसळून जवळपास 36 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती.

2) रायगड तळीये दुर्घटना : पंतप्रधानांकडून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची तर मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर! तसेच जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर.

3) पावसाचा हाहाकार! सातारा, रायगडमध्ये गावावर डोंगर कोसळले! अनेक घरं ढिगाऱ्याखाली; सांगली, कोल्हापूरला पुन्हा महापुराचा धोका.

 4) चिपळूणमध्ये छतावर अडकलेल्या 15 जणांना गावकऱ्यांनीच धाडस करुन सुखरुप बाहेर काढलं; अद्याप हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचावकार्य सुरु.

 5) डोंगर उतारांवरील गावे, वस्त्यांमधील रहिवाशांनी स्थलांतरासाठी प्रशासनास सहकार्य करावं; मुख्यमंत्र्याचं आवाहन.

6) आम्ही पोहोचलो, अधिकारी का नाही? बचावकार्यातल्या दिरंगाईवर विरोधकांचं बोट; दुर्घटनास्थळी सर्वात अगोदर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर व गिरीश महाजन उपस्थित.

7) राज्यातील पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात पंचवीस टक्के कपात; शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची महत्वपूर्ण माहिती.

8) हॉटशॉटला हवी होती अर्धनग्न छायाचित्रं अन् त्यासाठी 'तयारी'चे कलाकार!; राज कुंद्रा प्रकरणात धक्कादायक माहिती समोर.

9) टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा सुरू; भारताच्या 22 खेळाडूसह 6 अधिकारी या सोहळ्यात झाले सहभागी.

10) मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 138 अंकांनी वाढून 52,975 अंकावर बंद तर निफ्टीही 32 अंकांनी वाढून 15,856 अंकांवरती स्थिरावला....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या