💥जालना शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अविनाश कव्हळे......!


💥एस.एम.देशमुख आणि विश्वस्त किरण नाईक यांनीअविनाश कवळे आणि त्यांच्या नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले💥

मुंबई :जालना शहर मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार अविनाश कवळे यांची आज एकमताने निवड करण्यात आली.. परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख आणि विश्वस्त किरण नाईक यांनी अविनाश कवळे आणि त्यांच्या नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

महापालिका कार्यक्षेत्रात तसेच मोठ्या पालिका क्षेत्रात स्वतंत्र शाखा सुरू करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे.. त्यानुसार जालना शहर पत्रकार संघ स्थापन करण्यात आला आहे.. परिषदेचे उपाध्यक्ष प़ाचार्य सुरेश नाईकवाडे आणि विभागीय सचिव विशाल साळुंके यांच्या उपस्थितीत जालना शहरातील पत्रकारांची बैठक झाली.. त्यात पुढील एक वर्षासाठी नवी शहर कार्यकारिणी निवडण्यात आली.. ती खालील प़माणे आहे.

अध्यक्ष :अविनाश कवळे

कार्याध्यक्ष :सुहास कुलकर्णी 

सरचिटणीस :उमेश वाघमारे 

उपाध्यक्ष :राजेश भालेराव

कोषाध्यक्ष :अच्युत मोरे 

कार्यकारिणी सदस्य 

साहिल पाटील, विनोद काळे, इम़ान सिद्दिकी, आयशा खान, सदानंद देशमुख, विकास बागडी. 

बैठकीस ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या