💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभरातील महत्वाच्या हेडलाईन्स.....!


💥पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा💥

 ✍️ मोहन चौकेकर

1) राज्यातील ‘आयटीआय’ची प्रवेश प्रक्रिया सुरू : राज्यातील आयटीआयमध्ये प्रवेशासाठी एकूण ९१ प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत

2) काँग्रेस महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार; राहुल गांधींसोबत झालेल्या बैठकीत निर्णय – नाना पटोले

3) मनसेचं ठरलं, “३१ ऑगस्टला विश्वविक्रमी दहीहंडी होणार” यदा करोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीचा उत्सव होणार की नाही, याविषयी संभ्रम असताना मनसेनं विश्वविक्रमी दहीहंडीचा निर्धार व्यक्त केला आहे

4) पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

5) मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात आजही पावसाची संततधार, कोल्हापूर, सातारा, सांगलीतही पावसाची जोरदार हजेरी; पूरस्थिती निर्माण होण्याची वळविली शक्यता.

6) राज्यांना केवळ एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार देऊन उपयोग नाही; आरक्षणाची 50 टक्के मर्यादा शिथील करण्यासाठी काँग्रेस नेते अशोक चव्हाणांचे नवी दिल्लीत भेटसत्र

7) अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “राष्ट्रवादी जीवलग” उपक्रमाची सुप्रिया सुळे यांच्याकडून घोषणा

8) करोनामुळे पालकत्व गमावलेल्या मुलांसाठी 'राष्ट्रवादी‌ सेवा‌ दूत' देणार मायेचा आधार

9) बीडमधील भाजप नेत्यांची मुंडे भगिनींच्या विरोधात भूमिका : प्रदेश पातळीवरील नेत्यांनीही मुंडे समर्थकांच्या नाराजी अस्त्राकडे दुर्लक्ष करून योग्य तो संदेश दिला

10) चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्याची गळफास लावून आत्महत्या खूनाच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर कारगृहात झाली होती रवानगी

11) ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या कामांची ‘एसीबी’ मार्फत चौकशी करण्याची शिफारस!

12) “CAA, NRC चा हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पडण्याशी काहीही संबंध नाही”, मोहन भागवत यांनी मांडली भूमिका

13) CAA मुस्लिमांचं कोणतंही नुकसान होणार नसल्याचं राष्ट्रीय स्वंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

14) हजार वर्षातली सगळ्यात मोठी अतिवृष्टी: चीनमध्ये १६ बळी

15) मेट्रो स्थानकात पणी शिरल्याने शेकडो प्रवासी अडकले; बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू.

16) ऑक्सिजनअभावी मृत्यू न झाल्याचं ठाकरे सरकारचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र – भाजपाचा संजय राऊतांना टोला.

17) ऑक्सिजन अभावी एकाही मृत्यूची नोंद नसल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेला संबित पात्रांनी उत्तर दिलं आहे

18) अंगावर काटा आणणारा घटनाक्रम; आधी गोळ्या घातल्या; भारतीय असल्याचं समजताच दानिशच्या डोक्यावरून…

19) Danish Siddiqui last moments : अंगावर शहारे आणणारं क्रौर्य तालिबान्यांनी दानिश सिद्दीकीसोबत केल्याचा घटनाक्रम समोर आला आहे...

20) राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर-४’ शोमधून बाहेर?; ‘ही’ अभिनेत्री घेणार शिल्पाची जागा

21) राज कुंद्राच्या अटकेमुळे शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून आता याचा परिणाम शिल्पाच्या कामावर होत असल्याच दिसून येतंय.

22) “मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही,सामान्य गरीब जनता मेटाकुटीला आली असताना हे प्रस्थापितांचं सरकार गेंड्याची कातडी पांघरून बसलंय"

23) लडाखनंतर आता चीनची नजर उत्तराखंडच्या सीमेवर?; भारताकडून ५० हजार अतिरिक्त सैनिक तैनात

24) चिनी लष्कर उत्तराखंडजवळच्या बाराहोटी श्रेत्रामधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ अधिक सक्रीय झाल्याचं दिसून येत आहे, याच पार्श्वभूमीवर भारतही सज्ज झालाय

25) Bird flu Death : देशात ‘बर्ड फ्लू’मुळे पहिला मृत्यू; ११ वर्षीय मुलावर एम्समध्ये सुरू होते उपचार

26) बर्ड फ्लूमुळे एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूमुळे माणसाचा मृत्यू होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.

27) भारताकडून हरल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार व प्रशिक्षक यांच्यात बाचाबाची

28) श्रीलंका संघाचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. परंतु महत्त्वपूर्ण प्रसंगी झालेल्या चुकांमुळे यजमानांना पराभवाला सामोरे जावे लागले.... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या