💥राज्यातील लॉकडाऊन काळात उपासमारीची वेळ आलेल्या रोज मजुर हमाल शेतमजूरांना १० हजार आर्थिक मदत द्या...!


💥परभणी जिल्हा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी💥

परभणी (दि.५ मे २०२१) - राज्यासह परभणी जिल्ह्यातही कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन संचारबंदीची घोषणा केली परंतु लॉकडाऊन मुळे छोटे-मोठे व्यवसाईक रोजमजूर शेतमजूर हमाल घरकाम करणारे महिला-पुरूष कामगार यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आल्याने कोरोना महामारीमुळे कमी आणि उपासमारीमुळे लोक अक्षरशः मृत्यूच्या दाढेत अडकत आहेत या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी परभणी जिल्हा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी यांनी आज बुधवार दि.४ में २०२१ रोजी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांची आपल्या शिष्ठमंडळासह भेट घेऊन त्यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देऊन राज्यातील लॉकडाऊन काळात उपासमारीची वेळ आलेल्या रोज मजुर हमाल शेतमजूरांना आर्थिक मदत म्हणून त्यांच्या बँक खात्यात १० हजार रुपये तात्काळ टाकण्याची मागणी केली आहे.


जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुगळीकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की शासनाने कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन संचारबंदी मुळे रोज मजुरी करणारे रोजमजूर शेतमजूर हमाल यांच्यासह विविध प्रकारचे हातावर पोट असणारे हात मजूर सायकल रिक्षा चालक भाजीपाला विक्रेते फळ विक्रेते बुट चप्पल दुरुस्ती करणारे व्यवसाईक केस कर्तनालय चालवणारे व्यवसाईक तसेच सर्व प्रकारचे छोटा व्यवसाय करणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून शासकीय नौकरदार वगळता सर्व नागरिकांच्या बँक खात्यावर शासनाने प्रति महिना १०,००० हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये आर्थिक मदत म्हणून तात्काळ जमा करावी.


निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की युवा उद्योजकांनी विविध बँकांसह विविध महामंडळ व विविध फायनान्स मार्फत व्यवसाय करण्याकरिता घेतलेल्या कर्जाची परतफेड म्हणून बँकेतून फोन मेसेज हप्त्याची मागणी होत असल्यामुळे असे लहान सहान उद्योजक त्रस्त झाले आहेत त्यामुळे अशी कर्जाच्या हप्त्यांची सक्तीने होणारी वसुली जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी तात्काळ थांबवावी व कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यात यावा कारण कोरोना महामारीने आपल्या महाराष्ट्रात नसून पूर्ण जगावर धुमाकूळ माजवला आहे त्यामुळे लावण्यात आलेल्या लोकडाऊन संचारबंदी मुळे व्यवसायिकांचे व्यवसाय बंद आहेत आणि युवा उद्योजकां वर उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून त्या अनुषंगाने युवा उद्योजक बँकेचे हप्ते भरू शकत नाही आणि आता त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे कारण पुन्हा व्यवसाय उभा कुठून करायचा हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे म्हणून रिपब्लिकन सेनेचा एक जवाबदार पदाधिकारी असल्याने माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की तात्काळ नव उद्योजकांस व्यवसाईकांचे कर्ज माफ करून नव्याने व्यवसाय चालू करण्याकरिता पुन्हा त्यांना कर्ज देण्यात यावे

 राज्यातील घरकुलचा निधी वगळता सर्व विकास निधी आरोग्य विभागाकडे वळविण्यात यावा आणि जिल्ह्यासह तालुका पातळीवर कोविड-१९ सेंटरांची जास्तीत जास्त उभारणी करण्यात यावी आणि ऑक्सीजन बेड इंजेक्शन मेडिसिन डॉक्टर पोलिस नगर पालिका कर्मचारी व पत्रकार यांना सेफ्टी किटसह विविध प्रकारच्या आरोग्य आरोग्याशी संबंधित असणाऱ्या सुविधांवर निधीचा वापर करण्यात यावा जेणेकरून कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या कमी प्रमाणामध्ये होईल आणि जे रुग्ण आहेत ते उपचारापासून वंचित राहणार नाही आणि त्याचा मृत्यू होणार नाही म्हणून हा संपूर्ण विकास निधी आरोग्य विभागाकडे तात्काळ वळवण्यात यावा

 लोकडाऊन न लावता  नागरिकांना पूर्णवेळ प्रत्येक सुविधाही होम डिलिव्हरी देण्यात याव्यात जेणे करून नागरीक घराच्या बाहेर पडणार नाही आणि गर्दी होणार नाही आणि बिमारी पसरणार नाही असे विविध जनसामान्यांचे प्रश्न घेऊन रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील शिस्ठमंडळाने जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे यावेळी त्यांच्या सोबत रिपब्लिकन सेना तालुकाध्यक्ष विशाल खंदारे यांच्या अनेक पदाधिकारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या