💥वाशिम जिल्ह्यातील मानोरा पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम गिरोलीत स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई...!


💥स्थागुशाने केलेल्या कालरवाईत ३१ हजार ५५६ रुपयांया देशी विदेशी व गावठी हातभट्टी दारूसाठा जप्त💥

✍️फुलचंद भगत

वाशिम :- वाशिम जिल्हा स्थानिक गुन्हे शाखाचे पो.नि.शिवा ठाकरे यांना दि.१३ मे २०२१ रोजी गोपनिय सुत्रांकडून अशी माहिती मिळाली की मानोरा पोलिस स्टेशन हद्दीत ग्राम गिरोली येथे मोठया प्रमाणात गावठी हात भटटी दारूची विक्री होत असल्याची माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी त्यांचे अधिपत्या खालील अधिकारी/अमलदारांचे एक पथक ग्राम गिरोली येथे पाठवुन ग्राम गिरोली पोस्टे मानोरा येथे गावठी हातभटटी दारू गाळुन विक्री करणारे १)सदाशिव पिसाराम डाबरे २)संजय उंकडा राठोड यांचे घरी छापा मारून ४० लिटर गावठी हा.भ.दारू व १५० लिटर सडवा मोहा माच असा एकुण २३,०००/- रू किंमतीचा मुददेमाल जप्त करून दोन्ही आरोपी विरूध्द पोस्टे मानोरा येथे कलम ६५(अ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये वेगवेगळे गुन्हे नोंद करण्यात आले आहे तसेच दिनांक १४.०५.२०२१ रोजी पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक रवाना करून ग्राम शेलुबाजार ता. मंगरूळपीर जि.वाशिम येथील आठवडी बाजार परिसरातील देशी दारू दुकान चे बाजुला टिन पत्राचे शेड मध्ये विनापरवाना बेकायदेशीर रित्या देशी दारू ची विक्री होत असल्याबाबत माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मिळाल्या ठिकाणी छापा मारला असता दोन इसम नामे १)प्रतिमेश शिवनारायण जयस्वाल वय ३७ वर्ष २)राहुल देवराव गवई वय २७ वर्ष दोन्ही रा.आठवडी बाजार परिसर शेलु बाजार यांना ताब्यात घेवुन त्याचे जवळुन देशी दारू गुलाबी संत्राचे ९० मिली चे १०० क्वॉर्टर किंमत ३०००/- रू चे देशी दारू प्रिमीयम १११ चे ९० मिली चे ५० क्वॉर्टर किंमत १५००/- रू व देशी दारू टॅगो पंच चे ९० मिली चे ५० क्वॉर्टर किंमत १५०० रू असा एकुण ६०००/- रू ची देशी दारू विनापरवाना बेकायदेशीर रित्या मुददेमाल जप्त करून नमुद दोन्ही आरोपीविरूध्द पोलीस ठाणे मंगरूळपीर जि. वाशिम येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये दोन वेगवेगळे गुन्हे नोंद केले आहे.


तसेच आज दिनांक १५/०५/२०२१ रोजी पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक वाशिम ते मालेगांव रोडवरील अशोक मोहळेचा धाबा येथे पाठवुन छापा मारला असता धाबा मालक सुनिल जनार्धन मोहळे वय ३५ वर्ष रा.जांभरून पराडे यांचे ताब्यात देशी विदेशी दारू किंमत २५५६/- रू ची मिळुन आल्याने ती जप्त करून आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे कलम ६५ ई म.दा.का अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ऊपरोक्त कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री वसंत परदेशी, अपर पोलीस अधीक्षक श्री. विजयकुमार चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शिवा ठाकरे, सपोनि अतुल मोहनकर, सपोउपनि.भगवान गावंडे, नारायण जाधव पोना किशोर चिंचोळकर, सुनिल पवार, राजेश राठोड, अमोल इंगोले, मुकेश भगत,प्रशांत राजगुरू, पोकॉ निलेश इंगळे, अश्विन जाधव, प्रविण राउत,किशोर खंडारे,राम नागुलकर,राजेश गिरी,महिला नापोकॉ तहेमिना शेख व चालक मिलींद गायकवाड यांचे पथकाने केली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या