💥परभणी आयटीआय कोवीड सेंटरमध्ये रक्त तपासणी मोफत असतांना खाजगी लॅबद्वारे रक्त तपासणी करून रुग्णांची लूट...!


💥प्रहार जनशक्ती पक्षाने केला भांडाफोड संबंधितांवर कार्यवाही करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी💥

परभणी (दि.६ मे २०२१) - शहरातील आय.टी.आय. येथील कोवीड सेंटरमधील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दि.०४ मे २०२१ रोजी कोवीड प्रोफाईल या रक्त तपासणीसाठी वेलनेस या खाजगी लॅब च्या कर्मचाऱ्यांना बोलावुन रक्ताचे नमुने घेण्याचा प्रकार सुरु होता. शासकीय कोवीड रुग्णालयामध्ये कोवीड प्रोफाईलसह इतर सर्व तपासण्या महा लॅब द्वारे मोफत केल्या जात असतानाही खाजगी लॅबद्वारे कोविड प्रोफाईल तपासणीच्या नावाखाली रु.३५००/ - उकळल्या जात होते. इतर खाजगी लॅब मध्ये कोवीड प्रोफाईलचे १४०० ते १५०० रु. आकारले जातात परंतु ही वेलनेस लॅब ३५००/- रुपये घेत होती. मुळात ही टेस्ट मोफत असताना खाजगी लॅब मध्ये पैसे देऊन तपासणी का..? प्रहार जनशक्ती पक्षाकडे या बाबत तक्रार आली असता आय.टी. आय. कोवीड सेंटरचे डॉक्टर कदम यांच्याकडे या संबंधी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी फोनवर तक्रार केली असता डॉ. कदम यांनी तात्काळ कार्यवाही करत संबंधीत खाजगी लॅबच्या कर्मचार्यांना रक्ताचे नमुने व रुग्णाच्या रक्त तपासणीचे प्रत्येकी रु.३५००/ - परत केले व प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत सर्व रुग्णांचे महालॅब द्वारे मोफत रक्त तपासणी नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. शासकीय कोवीड सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या चाचण्या व उपचार मोफत असताना त्याच कोवीड सेंटरमध्ये काही डॉक्टर दलाली करत असुन ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना कोविडची भिती दाखवून खाजगी लॅबमध्ये तपासणी करायला लावत असुन दाम दुप्पट रक्कम वसुल करत आहेत. काही डॉक्टर फक्त पैशाच्या हाव्यासापोटी गरीब रुग्णांची लुट करीत आहेत. आय.टी.आय. कोवीड सेंटर मध्ये कडक सुरक्षा असताना ही खाजगी लॅब चा कर्मचारी कुणाच्या परवानगीने आत गेला हा मोठा गंभीर प्रश्न आहे. प्रहार जनशक्ती पक्षामुळे ही बाब जरी उघडकीस आली असली तरी असे डॉक्टर कोण यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. कुंपण जर शेत खायला लागलं तर दाद मागायची कोणाकडे..?

घडलेला सर्व प्रकारा बाबत काल प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने व पदाधिकाऱ्यांनी श्री. दिपक मुगळीकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन घटनेचा घटनाक्रम सविस्तरपणे सांगितलेला आहे व यावर जिल्हाधिकारी यांनी संबंधीतावर कार्यवाही करण्याचे तोंडी आश्वासन पण दिले आहे असे असले तरीही हे प्रकरण उजेडात घेण्याअगोदर आय.टी.आय. कोविड सेंटरसह इतर शासकीय कोवीड सेंटरवर अशा प्रकारच्या घटना राजरोसपणे सुरु असतील ही बाब अत्यंत गंभीर असुन प्रशासनाच्या नावाखाली सुरु असलेली ही लुट निंदनीय असून चीड निर्माण करणारी आहे या सर्व बाबीची व जिल्हयातील सर्व शासकीय कोविड सेंटरमधील रक्त तपासणी व सिटीस्कैन तपासणी अहवालाची चौकशी होने आवश्यक आहे अशा घटनांची सखोल चौकशी करुन प्रतिबंध घालून प्रशासनाने कठोर कार्यवाही करावी तसेच जिल्ह्यातील शासकीय कोविड सेंटर वर शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या मोफत सुविधांची यादी प्रत्येक शासकीय कोविड सेंटर बाहेर लावावी अश्या विविध मागण्यांचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकरी परभणी यांना देण्यात आले. आय.टी.आय. कोवीड सेंटर मधील प्रकरणाची सखोल चौकशी करुन अशा प्रकारची भाड खाणार्या व वैद्यकीय क्षेत्रास काळीमा फासणाऱ्या त्या डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष प्रशासनाच्या विरोधात तिव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी असे ही या निवेदनात म्हंटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, शहर प्रमुख पिंटू कदम, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर यांच्या सह्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या