💥वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडसी पथकाने अवैध दारूची तस्करी करणारे वाहन घेतले ताब्यात...!


💥स्थागुशाच्या कारवाईत ११ लाख ९२ हजार ८०० रूपयांची अवैध देशी-विदेशी दारुसह गावठी हातभटटीची दारू वाहनासह जप्त💥

✍️फुलचंद भगत

वाशिम (दि.१३ मे २०२१) - येथील स्थानिक गुन्हे शाखेचे कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक शिवा ठाकरे यांना दि.१२ मे २०२१ रोजी गोपनिय सुत्रांकडून अशी माहिती मिळाली की रिसोड शहरातुन मोठया प्रमाणात देशी विदेशी दारूचा साठा विक्री करिता काही इसम अवैधरित्या वाहतुक करित आहेत. अशा मिळालेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांनी त्यांचे अधिपत्त्याखालील अधिकारी/अमंलदारांचे एक पथक सकाळ पासुन रिसोड परिसरात नेमले असता पथकातील अधिकारी/अमंलदार यांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, रिसोड वरून मालेगावकडे एका बोलेरो कॉम्पर वाहनाने देशी विदेशीची दारूची अवैधरित्या वाहतुक होणार आहे.      

              मिळालेल्या माहितीच्या आधारे गस्तीवर असलेल्या अधिकारी/अमंलदार यांनी रिसोड-मालेगाव रोडवरील बिबखेड फाटा येथे सापळा लावला असता सायंकाळी १८.०० वा. चे सुमारास मिळालेल्या माहितीप्रमाणे रिसोड कडुन वाहन येतांना दिसले. सदर वाहन पोलीसांनी थांबवुन वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये इंपेरिअल ब्ल्यु कंपनीची विदेशी दारू १० पेटी व मॅकडॉवेल्स नं.१ कंपनीची विदेशी दारू १० पेटी अशी एकुण १,४८,८००/- रू. ची विदेशी दारू मिळुण आली सदर दारूबाबत वाहनचालक राजेश गोविंदराव काळमेघ रा. अकोला व त्याचा साथीदार गजानन जैताडे रा. वाशिम यांना विचारणा केली असता ते समाधाणकारक उत्तर देवु शकले नाही वरून सदर ची विदेशी दारू व वाहन बोलेरो कॅम्पर रजि.नं. एमएच ३० बीडी ३९१७ किंमत १०,००,००१/- रू. असा एकुण ११,४८,८००/- रू. चा माल वरिल दोन्ही आरोपीकडुन जप्त करून आरोपीविध्द पोलीस ठाणे रिसोड येथे कलम ६५(अ)महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंद

करण्यात आला आहे. आज दिनांक १३.०५.२०२१ रोजी पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक रवाना करून ग्राम कृष्णा ता.जि.वाशिम येथील गावठी हातभटटीची दारू गाळणारे विलास फकिरा राठोड व जोतीराम जयराम जाधव दोन्ही रा. कृष्णा यांचे घरी छापा मारून ७० लिटर गावठी हातभटटीची दारू व ३०० लिटर सडवा मोहमाच असा एकुण ४४,०००/- रूपये किमतीचा मुददेमाल जप्त करून नमुद दोन्ही आरोपीविरूध्द पोलीस ठाणे अनसिंग जि. वाशिम येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये दोन वेगवेगळे गुन्हे नोंद केले आहे उपरोक्त कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री वसंत परदेशी, अपर पोलीस अधीक्षक श्री. विजयकुमार चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शिवा ठाकरे, सपोनि अतुल मोहनकर, सपोउपनि भगवान गावंडे, नारायण जाधव पोना किशोर चिंचोळकर, सुनिल पवार, राजेश राठोड, अमोल इंगोले, पोकॉ निलेश इंगळे, अश्विन जाधव, प्रविण राउत महिला पोकाँ रेश्मा ठाकरे व चालक मिलींद गायकवाड यांचे पथकाने केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या