💥परभणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा क्रांती मोर्चा तर्फे करण्यात आले आंदोलन....!


💥सरकार न्यायालयात बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याबद्दल तीव्र खंत व्यक्त करण्यात आली💥

परभणी (दि.५ मे २०२१) : राज्यातील मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवार दि.५ में २०२१ रोजी दिलेल्या एका निर्णयाद्वारे रद्द केले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सरकार न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याबद्दल आंदोलकांकडून तिव्र खंत व्यक्त करण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात सरकारकडून मराठा आरक्षण टिकविण्यासाठी फारशा गांभीर्याने प्रयत्न न झाल्याच्या निषेधार्थ राज्य व केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या