💥कोविड -१९, म्यकॉरमायकोसिस या आजारामुळे होत आहे दंत व मुख आरोग्यावर दुष्परिणाम - डॉ.विलास साबने


💥लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता त्वरीत मुख दंत चिकित्सकाचां घ्या सल्ला💥

कोविड -१९  चा आपल्या संपूर्ण आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत आहे. याक्षणी आपल्याकडे कोणतेही उपचार किंवा लस नसली तरी आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही आपल्या संपूर्ण शारीरिक आरोग्याकडे लक्ष देत असतानाच मुख व दंत आरोग्याकडे सुध्दा लक्ष देणे खूप आवश्यक आहे आपल्यातील प्रत्येकजण नवीन परिस्थितीशी जुळवून घेत आहे कोरोनामुळे निर्माण झालेल्या  आणीबाणीसदृश अशा परिस्थितीमध्ये आपल्या दंत व मुख आरोग्याची काळजी घेणे सर्वात आवश्यकता आहे.  


 
 - सर्वात महत्वाचे -

हल्ली कोरोनातून बरे होऊन  आलेल्या पेशंटला 10-15 दिवसानंतर (postcovid) दात दुखणे,अचानक  दात हालणे ,हिरड्यातून पू येणे अशे लक्षण असलेले पेशंटचे प्रमाण वाढलेले आहे.

 💥म्युकॅारमायकोसिस म्हणजे काय ?

म्युकॅारमायकोसिस दुर्मिळ  असला तरी नवा नाही प्रतिकारशक्ती कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात असलेल्या तसेच अवयव प्रत्यारोपण केल्या जाणाऱ्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस म्हणजे  म्युकॅारमायकोसिस  होणे तसेच त्यामुळे मृत्यू  होणे अशा गोष्टी पूर्वीपासूनच घडत आहेत पण covid-19 मुळे त्याची लागण होत असल्याची गोष्ट नवी आणि धोकादायक आहे कविड-१९ मधून चांगल्या पद्धतीने बरं होत असलेल्या पेशंट्सना याची लागण होण्यामध्ये अचानक वेग वाढणे ही काळजीची बाब आहे या विकाराला झायगोमायकोसिस म्हणूनही ओळखले जाते सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल & प्रेवेंशन अर्थात सीडीसी च्या म्हणण्यानुसार हा बुरशीजन्य संसर्ग दुर्मिळ आहे.गेल्या 15 दिवसांत आमच्या सेंटर  येथे कोविड-19मुळे झालेल्या म्युकॉर्मायकॉसिसच्या ८ ते १० केसेस आढळल्या आहेत.


म्युकॅारमायकोसिस नावाच्या बुरशीमुळे हा संसर्ग होतो. ही बुरशी पर्यावरणात नैसर्गिक रित्या अस्तित्वात असते मात्र जेव्हा मानव शरीराची प्रतिकारक शक्ती क्षीण झालेली असते, तेव्हा तिचा संसर्ग शरीरात होतो. या बुरशीचा कण श्वासाद्वारे शरीरात गेल्यावर फुफ्फुस तसेच सायनस यांच्यावर त्याचा दुष्परिणाम होतो. खुल्या जखमां मधूनही ही बुरशी  शरीरात प्रवेश करू शकते म्युकॅारमायकोसिस लागण संसर्गजन्य नाही म्हणजे एकापासून दुसऱ्याला, प्राण्यांपासून माणसाला त्याची लागण होत नाही असेही सीडीसी ने स्पष्ट केलेले आहे. लवकर व योग्य निदान आणि योग्य बुरशी प्रतिकारक उपचार पध्दती हे पेशंट लवकर बरे होण्यासाठी आवश्यक आहे.

💥म्युकॅारमायकोसिसचा धोका कोणाला ?

-मधुमेह,उच्च रक्तदाब,लठ्ठपणा असलेल्या रुग्णांना म्हणजे एकंदरीत ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे अशा लोकांना म्युकर म्युकॅारमायकोसिसचा जास्त धोका आहे.

 💥म्युकॅारमायकोसिसची लक्षणे कोणती ?

-तोंडाच्या एका बाजूला सूज येणे,दातातून पू येणे,दात हलणे,जबड्याचे हाड उघडे पडणे,डोके दुखणे,सायनसमध्ये (नाकपुड्यामध्ये) रक्त संचय,डोळ्यांना सूज येणे,डोळ्यांची हालचाल कमी होणे,  -चेहऱ्यांच्या वर सूज आलेल्या जागी त्वचा काळी पडणे,नाकात श्वास घेण्यास अडथळे निर्माण होणे,नाकात काळे सुके क्रस्ट तयार होणे.

💥Covid-19 आणि म्युकॅारमायकोसिस💥

म्युकॅारमायकोसिस हा आजार  मधुमेह असणारे रुग्ण, जे रुग्ण steroids वर आहे अशा रुग्णांमध्ये प्रतिकारक शक्ती कमी असते. Covid-19 उपचार घेत असलेल्या रुग्णांना steroids आणि आणखी काही औषधे देण्यात येतात जेणेकरून त्यांचा आजार बरा होईल पण यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वर वाईट परिणाम होतो या  सगळ्यांमुळे म्युकॅारमायकोसिसचा धोका वाढतो

💥म्युकॅारमायकोसिस चे निदान कसे  करायचे ?

-सिटीस्कॅन (CBCT),इंडॉस्कॉपी व बायोप्सी च्या साह्याने आपण लवकर  म्युकॅारमायकोसिसचे  निदान करू शकतो त्यामुळे वरील लक्षणे आढळल्यास त्वरित आपण दंत व मुख्य आरोग्य विशेष तज्ञ  सल्ला घेणे आवश्यक आहे.

💥म्युकॅारमायकोसिस वर उपचार काय ?

तातडीने निदान करून  बुरशी प्रतिकारक उपचार पद्धती अवलंब करणे आवश्यक आहे  (Antifungal therapy) पण संसर्ग शरीराच्या इतर अवयावा पर्यंत पोहोचला  असल्यास शस्त्रक्रिया करण्याची गरज पडू शकते उपचार करण्यास विलंब झाल्यास होणारी गुंतागुंत अवघड आहे या संसर्गामुळे दृष्टी जाऊ शकते तसंच नाक  आणि जबड्याच्या हाडावर दुष्परिणाम होतो आणि पंधरा दिवसात या संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्यास पेशंटच्या मृत्यूची शक्यता 50% असते असं सीडीसी च्या म्हणण्यानुसार आपल्याला कळलं आहे त्यामुळे  कोविड मधुन बरे झालेल्या रुग्णांनी आणि खास करून सोबत मधुमेह आणि इतर आजार असलेल्या रुग्णांनी एकदा मुख आरोग्य  तपासणी न चुकता करून घ्यावी कारण पुढे निस्तारण्यापेक्षा वेळेवर काळजी घेतलेली बरी अशा महामारीच्या काळात कोणतेही डेंटल इमर्जन्सी उद्भवू नये म्हणून काही महत्वाची काळजी कशी घ्यायची हे खाली दिलेले आहे..

💥महत्वाची काळजी कशी घ्यावी💥

1.दिवसातून दोनदा ब्रश करा. दररोज दात घासणे ही एक गरज आहे. इंडियन डेंटल असोसिएशन फ्लोराईड टूथपेस्टने दोन मिनिटांसाठी दिवसातून दोनदा दात घासण्यास सुचवते सकाळी उठल्यावर आणि झोपायच्या आधी दात घासण्याची सवय लावा दात साफ करण्याचे काही फायदे दाताच्या किडीचा धोका कमी होतो अन्नाचे बारीक कण आणि घाण अडकून

💥दुर्गंधीचा त्रास होतो तो दात साफ केल्यामुळे होत नाही तोंडाची स्वच्छता राहते💥

२. अँटीबैक्टीरियल माउथवॉश वापरा-

बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा माउथवॉश वापरल्याने दुर्गंधी दूर ठेवणे, जीवाणू काढून टाकणे आणि दंत आरोग्य राखण्याचा एक चांगला मार्ग आहे.

माउथवॉशमुळे कीड ,दातावर पिवळा थर  तयार होणे, दात किडणे आणि हिरड्यांना येणारी  सूज यासारख्या अनेक  आरोग्यासंबंधी समस्या टाळता येते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे दाताच्या इनामलची (दातावरचा सर्वात कठीण थर)   मजबूती वाढवते आणि कोणत्याही अपायकारक घटकांपासून दातांचे संरक्षण करते.

टिपः जर तुमचे तोंड कोरडे पडण्याची समस्या  असेल तर नॉन- अल्कोहोलिक माऊथवॉश वापरा किंवा तुमच्या दंतचिकित्सकांचा सल्ला घ्या.

3. आपल्या आहाराची काळजी घ्या-

 साथीच्या आजारात, आपले दंत व मुख आरोग्य चांगले राखण्यासाठी   सकस व पोषक   आहार घेणे आवश्यक आहे.

सकस व उत्तम  आहाराच्या काही सूचनाः

- जेवणा दरम्यान शीतपेय किंवा चॉकलेट सारख्या चवदार पदार्थांचे सेवन करणे टाळा.

-ताजी भाज्या आणि फळे खा.

स्वत: ला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या.

- केक आणि चॉकलेट सारख्या चिकट खाद्यपदार्थ खाऊ नका.

-सतत खाणे टाळा.

-जंक फूडला “नाही” म्हणा.

- बदाम आणि बीन्स सारख्या कॅल्शियममध्ये समृद्ध असलेले अन्न खा.

-चांगला आहार घेतल्यामुळे केवळ दंत आरोग्यासच चालना मिळत नाही तर विषाणूंविरूद्ध प्रतिकारशक्ती देखील वाढते.

4. धूम्रपान करणे टाळा-

धूम्रपान केल्याने तुमच्या मुख आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

मुख आरोग्यावर धूम्रपान करण्याचे काही दुष्परिणाम आहेतः-

-हिरड्यांचे आजार

-दातावर पिवळा थर तयार होणे.

- दात कमकुवत होणे किंवा दात हालूण गळणे.

- दात किडणे.

- दातावर डाग तयार होणे.

-श्वासाची दुर्घंधी.

 -तोंडाचा कर्करोग.

आपल्या मुखआरोग्य  चांगले  राहण्यासाठी धूम्रपान करणे टाळा.

5. दररोज फ्लॉस (धागा) वापरा-

बहुतेक वेळा लोक दातामध्ये  अडकलेल्या अन्न कण काढण्यासाठी  मुक्त होण्यासाठी टूथपिक्स किंवा त्यांच्या नखे ​​वापरतात,त्यामुळे दाताला व हिरड्यांना दुखापत होण्याची शक्यता असते.धागा वापरल्यामुळे दात स्वच्छ होतात फ्लोसिंग हा दातामधली जागा स्वच्छ करण्याचा आणि आपले हास्य उत्तम राखण्याचा एक सोपा मार्ग आहे आपल्याला दात स्वच्छ करणे कठिण वाटत असल्यास आपल्या दंतचिकित्सकाचा सल्ला घ्या.

बोनस टिप्स:

 -दर 3 महिन्यांनी आपला टूथब्रश बदला

 -आपला टूथब्रश गरम पाण्याने काही मिनिटांसाठी स्वच्छ करून दररोज निर्जंतुकीकरण करा.

- आपली जीभ ब्रश करण्यास विसरू नका.

-प्रत्येक जेवणानंतर आपले तोंड स्वच्छ धुवा.

-स्वत: ची औषधोपचार करू नका

शेवटी इतकंच की कोरोना महामारीमध्ये आपले हात वारंवार धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे जेवढे महत्वाचे आहे, तेवढेच आपल्या दंत व मुखआरोग्याची सुध्दा काळजी घेणे आवश्यक आहे काही शंका असेल तर जवळच्या दंत रोग तज्ञाला लगेच दाखवा

डॉ.विलास साबणे

डॉ.श्याम गमे

स्मित डेंटल केअर 

शेटे कॉम्प्लेक्स डॉ.लेन गंगाखेड

9763066149

9867661549

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या