💥मुंबईतील कोविड-९० लसीकरण केंद्रांवर गर्दी,गोंधळ आणि हाल पहिली मात्रा घेणाऱ्यांचीही उपस्थिती....!


💥लशीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने अनेक जण लस न घेताच माघारी💥

मुंबई : लशीचा पुरेसा साठा उपलब्ध नसतानाही ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण खुले करण्याच्या पालिकेच्या निर्णयामुळे अनेक केंद्रावर गोंधळ निर्माण झाला दुसरी मात्रा घेणाऱ्यांसह पहिल्या मात्रेसाठीही मोठय़ा प्रमाणात गर्दी झाल्याने गर्दीला आवरताना यंत्रणेची तारांबळ उडाली त्यामुळे अनेकांना लस न घेताच परतावे लागले पालिकेने साठय़ाअभावी चार दिवस ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद ठेवले होते पालिकेने मंगळवारी दुसऱ्या मात्रेचे लसीकरण करण्याचे जाहीर केले. 

त्यामुळे अनेक केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी झाली वरळीतील राज्य विमा कामगार रुग्णालयात ४५ वर्षांपुढील आणि लशीची पहिली मात्र घेणारेही येत होते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत सुमारे ३५० नागरिकांना दुसरी मात्रा दिली गेली दरम्यान नोंदणी केलेले वेळ न घेतलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचीही केंद्रावर गर्दी झाली होती यातून काहीजण वादही घालत होते असे केंद्रावरील अधिकाऱ्यांनी सांगितले वरळीतील पोदार रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरही हीच स्थिती होती. 

मात्र ६० वर्षांपुढील आणि अद्यापही लस न घेतलेले ज्येष्ठ आले तर त्यांचे लसीकरण केल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.२६,९४४ जणांचे लसीकरण मंगळवारी मुंबईत एकूण २६ हजार ९४४ जणांचे लसीकरण केले गेले. यात १८ ते ४४ वयोगटातील २३६० जणांचा समावेश होता तर ६० वर्षांवरील १३,०८६ आणि ४५ ते ६० वयोगटातील ८५१४ जणांनी लस घेतली. ४५ वर्षांपुढील लसीकरण आजपासून नियमित पालिकेसाठी सुमारे १ लाख लसींचा साठा मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मुंबईत दाखल होईल बुधवारी सकाळी हा साठा वितरित केला जाणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या