💥पुर्णा तालुक्यातील माखणीतील शेतकऱ्याने ओंकार गृहउद्योगाची निर्मिती करून ग्रामीण भागातील महिलांना केले स्वावलंबी....!


💥उद्योगपती इंद्रजीत वरपुरडकर यांनी अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर लोनचे खरेदी करुन ओंकार गृहउद्योगाला दिले प्रोत्साहन💥

पूर्णा (दि.१६ मे २०२१) - कृषी उद्योगाला जोडधंदा म्हणून तसेच ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने तालुक्यातील माखणी येथील शेतकऱ्याने अनोखा व कौतुकास्पद उपग्रम राबवत ओंकार गृहउद्योग सुरू करून ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम उपलब्ध करुन दिले तालुक्यातील माखणी येथील ओंकार गृहउद्योगास अक्षयतृतीयाच्या शुभ मुहुर्तावर उद्योगपती इंद्रजीत वरपुरडकर,निलेश कारेगावकर व तृप्तीताई वरपुडकर यांनी दिली भेट देऊन प्रोत्साहन दिले.


कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने लॉकडाउन जाहीर केले परंतु माखणी येथील प्रगतसिल शेतकरी शेती करत शेतीला पुरक व्यवसाय म्हणून महीला बचतगट बळीराजा स्वयंम साह्यता समुह व ओंकार गृहउद्योग या मार्फत महीलांच्या हाताला काम देत आंबा लोणचे,तुर,मुग,उडीद,दाळ,पापड,जवस चटणी,तीळ चटनी,शेंगदाणे लाडु व इतर मागणीनुसार ग्रहउपयोगी पदार्थ कृषी मित्र सेच पूर्णा व्हाटसप ग्रूपच्या माध्यमातून घरपोच दिले जाते याच माहीतीच्या आधारे शुक्रवार दि.१४ मे २०२१ रोजी गृह उद्योगास प्रसिध्द उद्योगपती इंद्रजीत वरपुरडकर व निलेश कारेगावकर,तृप्तीताई वरपुडकर,टाटा कंपनीचे अधिकारी महेश दुधाटे यांनी अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याला महत्त्व न देता जीवन आवश्यक वस्तु खरेदी करुन ग्रामीण भागातील शेतकरी जनार्धन आवरगंड व महीला बचतगटाच्या अध्यक्षा सौ.मिरा आवरगंड, कु.शिवानी आवरगंड,बालासाहेब आवरगंड व इतर बचत गटातील महीला यांना घरी भेट देवुन वस्तु खरेदी केल्या. 


पुढे बोलतांना तृप्तीताई वरपुडकर यांनी गृह उद्योगाबाबत सर्वोतोपरी माहीती सांगीतली आलेल्या अडचणीत मदत करण्याचे आश्वासन दिले . कोरोनाच्या काळात सर्वच घरी बसले परंतु शेतकरी पोटासाठी जीवमुठीत घेवुन काम करत आहे हे जग पाहते म्हणून कोणत्याही शेतकरी बांधवांनी खचुन न जाता जोमाने जोड व्यवसाय करणे गरजेचे आहे . गृह उदोगामार्फत उत्पादित केलेल्या मालाची विक्री करण्यासाठी मी मदत करेल म्हणून सर्व महीलानी जोमाने काम करावे असे म्हणून प्रोत्साहन दिले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या