💥परभणी जिल्ह्यात कालच्या तुलनेत आज शुक्रवार दि.२१ मे रोजी कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ...!

 


💥जिल्ह्यात आज नव्याने आढळले ४०८ कोरोनाबाधीत रुग्ण तर उपचारा दरम्यान ८ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू 💥

परभणी (दि.२१ मे २०२१) - परभणी जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनासह पोलिस प्रशासनाच्या संतर्कतेमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या हळुहळू कमी होतांना दिसत होती परंतु काल गुरुवार दि.२० मे २०२१ रोजी जिल्ह्यात आढळलेल्या १४१ कोरोनाबाधीत रुग्णांच्या तुलनेत आज शुक्रवार दि.२१ मे २०२१ रोजी कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून आज शुक्रवारी जिल्ह्यात नव्याने ४०८ कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने प्रशासन हादरले आहे.

जिल्ह्यात आज शुक्रवार दि.२१ मे २०२१ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचार घेऊन पुर्णपणे बरे झालेल्या ११५ रुग्णांना रुग्णालय प्रशासनाने सुट्टी दिली असून जिल्ह्यात आज शुक्रवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान ८ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात आजपर्यंत ४७६४१ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून यशस्वी उपचारा नंतर आजपर्यंत ४३५७४ कोरोनाबाधीत कोरोनामुक्त झाले आहेत तर जिल्ह्यात आजपर्यंत ११८२ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने एका प्रेसनोट द्वारे कळवले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या