💥परभणी जिल्ह्यात आज शुक्रवारी नव्याने आढळले ६२० कोरोनाबाधित रुग्ण....!


💥जिल्ह्यात आज शुक्रवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान २३ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू💥

परभणी (दि.७ मे २०२१) - जिल्ह्यात आज शुक्रवार दि.७ मे २०२१ रोजी तब्बल ६२० कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर रुग्णालयात उपचारा दरम्यान २३ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच रुग्णालयात यशस्वी औषधोपचार घेऊन बरे झालेल्या ६८४ कोरोनामुक्त व्यक्तींना आज शुक्रवारी रुग्णालयातून सुट्टी दिल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात ७ हजार ७६३ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात आजपर्यंत १००६ कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत ४२ हजार ७२ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी ३३ हजार ३०३ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत २ लाख ६० हजार ७४९ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात २ लाख १८ हजार ५७५ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ४० हजार ९८१ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह,१०५३ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या