💥बिड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार परळी पंचायत समिती प्रशासन अँक्शन मोडवर....!


💥तालुक्यात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे💥

परळी वैजनाथ (दि.२१ मे २०२१) ; ग्रामीण भागातील वाढत्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार पंचायत समिती प्रशासन अँक्शन मोडवर आले असून नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी तालुक्यातील आशा वर्कर्सची बैठक घेऊन सुचना देण्यात आल्या.

     येथील पंचायत समिती येथे आशा वर्कर्स ची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे, गटविकास अधिकारी संजय केंद्रे, सभापती बालाजी (पिंटू) मुंडे उपस्थित होते. यावेळी सुचना देण्यात आल्या की, गावात आशा वर्कर्स यांच्या वतीने तपासणी करण्यात येवून ज्यांना लक्षणे आहेत. त्यांची यादी तयार करून रोजचे रोज प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करावयाची आहे. गावातील संशयित रुग्णांची प्राथमिक आरोग्य केद्राचे पथक  गावात जाऊन अँटीजेन तपासणी करणार आहे. यासाठी तालुक्यात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात पथक तयार करण्यात आले आहे. १०४ गावात तपासणी ५ प्राथमिक आरोग्य केंद्रात ५ मोबाईल व्हँन पथके तयार करण्यात आली आहेत. तालुक्यातील २०९ आशा वर्कर्स यासाठी काम करत आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे तपासणी वाढवणे. तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आता इथून पुढे होम आयसोलेशन बंद करण्यात आले असून संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील पाच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केद्रा असणाऱ्या गावात किंवा जिल्हा परिषद शाळेत आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात येत आहे. 

 जिल्हा परिषद शाळेत आयसोलेशन सेंटर ग्रामीण भागासाठी तयार करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर लसीकरणा संदर्भात गावात जनजागृती करण्यात येणार असून यासाठी एझी अँपचा वापर आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर नंबर प्रमाणे लस देण्यात येणार आहे.

--------------------------------------------

यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांनी सांगितले की, गेल्या वर्षी सप्टेंबर आँक्टोबर ३०० ते ४०० कोरोना पाँझिटीव्ह रुग्ण आढळून येत जिल्ह्यात होते. एका दिवसात जास्तीत जास्त 45 ते 50 रुग्ण आढळून येत. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यात हा आकडा १५० पर्यंत पोहचला आहे. तालूक्याचा पाँझिटीव्ह रेट १० टक्के होता. आता तो २८ टक्यांवर पोहचला आहे. तो कमी करण्यासाठी प्रत्येक गावातील संशयित रुग्णांची अँटीजेन तपासणी आवश्यक आहे. ती आशावर्कर्स मार्फत करण्यात येईल. सर्व आशिवर्कर्स नी आपले काम प्रामाणिकपणे पार पाडावे.

------------------------------------------------

गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी सांगितले की, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अज्ञान आहे. हे अज्ञान दूर करणे आवश्यक आहे. तसेच पाँझिटीव्ह रुग्ण आढळून आल्यास गावातील नागरीक या रुग्णाबाबत वेगळी वागणूक देतात गावकऱ्यांनी असे करु नये. व आपल्याला लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी. ती लपवता कामा नये     आशावर्कर्स ने गावातील संशयित रुग्ण शोधून त्याची माहिती रोजच्या रोज देणे आवश्यक आहे.

------------------------------------–---------

पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांनी यावेळी सांगितले की, रुग्ण संख्या अशीच वाढत गेल्यास प्रत्येक गावात आयसोलेशन सेंटर तयार करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायतने जिल्हा परिषदेच्या शाळेत अथवा सभागृहात विज, पिण्याचे पाणी, सांडपाणी, टाँयलेटची व्यवस्था करायवयाची आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना निर्देश देण्यात आले आहेत. आशावर्कर्स ला काही अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क करावा. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून त्यांच्या येणाऱ्या अडचणी सोडवण्यात येतील.

------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या