💥वाशिम येथील महात्मा फुले चौकात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई.....!


💥अवैध रित्या दारुची वाहतुक करणाऱ्या वाहनासह ५ लाख २४ हजार ७६८ रुपये किंमतीची देशी दारू जप्त💥

✍️फुलचंद भगत

वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक श्री. वसंत परदेशी सो यांनी वाशिम जिल्हयाचा पदभार स्विकारल्यापासुन त्यांनी अवैध धंदयाविरूध्द कडक कारवाईचा बडगा उचलला. त्याचाच एक भाग म्हणुन आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वाशिम शहरातुन वाहन कमांक एम.एच. ०४ जि.डी. ४९०४ कमांकाची गाडी अवैध देशी दारूची वाहतुक करणार आहे त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे यांना सदर विरूद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले.


स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनिरी वाढवे, पोना सुनिल पवार, अमोल इंगोले,राजेश राठोड, पोशि.संतोष शेणकुडे व मपोशि संगीता शिंदे यांचे पथकाने महात्मा फुले चौकामध्ये दोन पंचासमक्ष नाकाबंदी लावली. काही वेळा नंतर संशईत वाहन क्रमांक एम.एच.०४ जि.डी. ४९०४ क्रमांकाचे वाहन देवपेठ कडुन येताना दिसले असता मोठया शिफायतीने त्यास थांबवुन त्याचे गाडीची झडती घेतली असता त्याचे गाडीचे डिक्की मध्ये १) देशी दारू लावणी संत्रा कंपनीच्या एकुण ०३ पेटया, २) देशी दारू भिंगरी संत्रा कंपनीच्या एकुण ०४ पेटया, ३) देशी दारू टँगो पंच कंपनीच्या एकुण ०२ पेटया अशा एकुण ०९ पेटया देशी

दारूच्या पेटया व सदर पेटया वाहतुक करणारे वाहन क्रमांक एम.एच. ०४ जि.डी. ४९०४ असा एकुण ५,२४,७६८/- रु किंमतीचा माल जप्त करून पोलीस ठाणे वाशिम शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.नमुद कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री वसंत परदेशी, अपर पोलीस अधिक्षक श्री. विजयकुमार चव्हाण,यांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक शिवाजी ठाकरे स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, सपोनिरी अजयकुमार वाढवे, पोना सुनिल पवार, अमोल इंगोले, राजेश राठोड, पोशि संतोष शेणकुडे व मपोशि संगीता शिंदे यांचे पथकाने केला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या