💥पंढरपूरच्या विजयाने पडळकर यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब - सखाराम बोबडे पडेगावकर


💥अशी प्रतिक्रिया धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी व्यक्त केली💥

प्रतिनिधी

 पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणुक महाविकास आघाडी विरुद्ध पडळकर अशीच लढली गेली. समाधान आवताडे यांच्या विजयाने आ. गोपीचंद पडळकर यांच्या नेतत्त्वावर शिक्कामोर्तब झाले असल्याची प्रतिक्रिया धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी व्यक्त केली.


पंढरपूरच्या पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी लागला. यात आ गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवलेले भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले. महा विकास आघाडीतर्फे पक्षाचे नेते पंढरपुरात ठाण मांडून बसले होते, पण  गोपीचंद पडळकर यांनी हा विजय मिळवून दिला .धनगर बहुल मतदार असलेल्या या मतदारसंघात मतदारांनी पडळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजप चा उमेदवार विजयी केला. बिरोबाच्या आशीर्वादाने पडळकर लवकरच विधानरिषदेतील विरोधी पक्षनेते होतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. एकूणच या निकालाने पडळकर यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले असल्याची प्रतिक्रिया धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर  यांनी व्यक्त केली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या