💥परभणी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तिना कोवीड तपासणी, उपचार व लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात यावे...!


💥प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी💥

परभणी (दि.७ मे २०२१) - जिल्हयामध्ये वाढता कोविड संक्रमणाचा आलेख पाहता सामान्य नागरिकांना कोविड तपासणी,उपचार व लसीकरणा साठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. सामान्य कोविड रुग्णांना उपचारासाठी बेड मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे त्याशिवाय कोविड संक्रमण विरोधी लासिकरणासाठी नागरीकांना लांबच लांब रांगा लावून तासानंतास रांगेत उभे राहावे लागते या सर्व बिकट परिस्थिती मध्ये दिव्यांग बंधू भगिनी यांची यात फरफट होत आहे. त्यांची अडचण विचारात घेता जिल्ह्यातील दिव्यांग बंधू भगिनी यांना कोवीड तपासणी, उपचार व लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पदाधिकाऱ्यांच्या शिष्ट मंडळासह जिल्हाधिकारी श्री.दिपक मुगळीकर यांची भेट घेऊन त्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.


दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम २५ ( १ ) ( क ) नुसार दिव्यांग व्यक्तिच्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता त्यांच्या उपचाराची दखल घेणे व त्यांना उपचारात प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या कोवीड आजाराची परिस्थिती लक्षात घेता दिव्यांगांना संबंधीत आजाराची तपासणी, उपचार व लसीकरण करण्यासाठी लांबचलांब रांगेत तासंतास उभे राहावे लागत आहे. दिव्यांग व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती सर्वसामान्य व्यक्तिच्या तुलनेत तितकिशी चांगली नसल्याने दिव्यांगांना या रांगेमध्ये उभे करणे चुकीचे आहे.

परभणी जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागामध्ये कोवीड आजाराची तपासणी व लसीकणासाठी केंद्रासमोर मोठ - मोठ्या रांगा लागल्या आहेत. करीता दिव्यांगासाठी कोविड तपासणी व लसीकरण करण्यासाठी रांगेचा निकष न लावता त्यांना थेट तात्काळ प्रवेश देवुन तपासणी व लसीकरण करण्यात यावे त्याच बरोबर दिव्यांग व्यक्ती जर कोविड ने संक्रमीत झाली असेल तर अशा व्यक्तींना सर्व शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व जिह्यातील सर्व शासकीय कोवीड सेंटर येथे उपचारासाठी तात्काळ बेड उपलब्ध करुन देऊन उपचार करण्यात यावे व याकरिता वरील सर्व ठिकाणी दिव्यांगसाठी ५ टक्के बेड आरक्षित ठेवण्यात यावे असे ही या निवेदनात म्हंटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे पाटील, शहर प्रमुख पिंटू कदम, दिव्यांग अघाडी तालुकाप्रमुख  ज्ञानेश्वर पंढरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या