💥परभणी जिल्ह्यात १० मे २०२१ पर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश....!


💥कोरोंना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाश्वभूमीवर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी केले आदेश जारी💥

परभणी (दि.४ मे २०२१) : जिल्ह्यातील कोरोंना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाश्वभूमीवर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आज मंगळवार दि.४ मे २०२१ रोजी दुपारच्या सुमारास जारी केलेल्या एका आदेशाद्वारे जिल्ह्यात ४ मे पासून १० मे २०२१ रोजी सकाळी सात वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व किराणा सामान,भाजीपाला, फळ विक्रेते, बेकरी, मिठाई घर, खाद्य दुकाने अन्य सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना बंद राहतील असे नमूद केले आहे .वैद्यकीय सुविधा रुग्णालय औषध विक्रेते यांना यातून सूट राहणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या