💥यवतमाळ येथील शहा हॉस्पीटल या खासगी कोविड रूग्णालयात मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा गभीर प्रकार...!


💥संतप्त जमावाकडून शहा हॉस्पीटल या रुग्णालयात तोडफोड💥 

यवतमाळ येथील वादग्रस्त ठरलेल्या शहा हॉस्पीटल या खासगी कोविड रूग्णालयात मृतदेहाची अदलाबदल झाल्याने मृत रूग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केली काल रविवार दि.९ मे २०२१ रोजी सकाळी ११-०० वाजता घडलेल्या या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे यवतमाळ येथील ॲड.अरुण गजभिये आजारापणामुळे येथील शहा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते मात्र उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला होता नातेवाईकांनी सकाळी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला मृतदेह घेऊन सर्व नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी पांढरकवडा मार्गावरील मोक्षधामात पोहोचले. तेथे त्यांनी रॅपरमध्ये गुंडाळलेला मृतदेह उघडून बघितला असता तो ॲड.गजभिये यांचा नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली.

या प्रकारामुळे संतप्त झालेले नातेवाईक मृतदेह घेऊन थेट रूग्णालयात पोहोचले तेथे त्यांनी हॉस्पीटल व्यवस्थापनास जाब विचारला मात्र डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने नातेवाईकांनी दवाखान्यात तोडफोड सुरू केली यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली ॲड.गजभिये यांच्या मृतदेहाऐवजी त्यांच्या नातेवाईकांना आर्णी येथील सेवानिवृत्त सहायक फौजदार दिगांबर शेळके यांचा मृतदेह देण्यात आला शेळके यांचाही मृत्यू शनिवारी रात्रीच झाल्याचे सांगण्यात आले परंतु त्यांच्या नातेवाईकांकडून देयकाची रक्कम जमा न केल्याने शेळके यांचा मृतदेह व्यवस्थापनाने दिला नाही असा आरोप मनिषा दिगांबर शेळके यांनी यावेळी केला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या